Kapil Sharma Death Threat : कॉमेडियन कपिल शर्मा याला काही अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. केवळ कपिल शर्मालाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांना आणि सहकलाकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले आहेत.
धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने कपिल शर्मा आणि त्याचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, ओळखीचे, सहकारी आणि शेजाऱ्यांसह सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात मुंबईतील आंबोली पोलिसांनी कलम ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, कपिल किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कपिलला ज्या ईमेलद्वारे धमकी देण्यात आली, त्याचा आयपी ॲड्रेस पाकिस्तानचा असल्याचीही माहिती समोर येत आहे.
याआधी कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. हा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आयपी ॲड्रेस आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे धमकी देणाऱ्या अभिनेत्याचा शोध घेत आहेत. ईमेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'आम्ही हे पब्लिसिटी स्टंटसाठी करत नाही आहोत. तुमच्या सर्व उपक्रमांची माहिती आमच्याकडे आहे. आम्ही पुढील ८ तासांमध्ये आपल्या त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करतो. आम्हाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही मानू.' या तिन्ही सेलिब्रिटींना वेगवेगळ्या वेळी धमकीचे ईमेल आले आहेत.
गेल्या वर्षी सलमान खान आणि एपी धिल्लन यांनाही धमकीचे ईमेल आले होते. सलमान खानच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता, ज्याचा दावा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने केला होता. मात्र, नंतर सलमानला सुरक्षा मिळाली आणि त्याने बुलेटप्रूफ कारही खरेदी केली. याशिवाय घराच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काचही लावण्यात आली होती.
आता कपिललाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिल शर्मा नुकताच नेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसला होता, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. हा शो नुकताच नेटफ्लिक्सवर संपला आहे. या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
संबंधित बातम्या