मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 31, 2024 09:17 AM IST

कपिल शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी भरघोस फी आकारली आहे. त्याच्या या फीच्या आकड्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले आहे.

कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!
कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

चाहते कॉमेडियन कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची आतुरतेने वाट पाहत होते. या कार्यक्रमाचा पहिला भाग काल रात्री शनिवारी प्रसारित झाला. यावेळी हा शो टीव्हीवर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जात आहे. मात्र, पूर्वीप्रमाणेच यावेळीही कपिल शर्मा होस्टिंगची जबाबदारी सांभाळताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा याने पहिल्या एपिसोडसाठी भरघोस फी आकारली आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी कपिल शर्मा आणि इतर स्टार्सनी किती फी घेतली आहे, जाणून घेऊया...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी भरघोस फी आकारली आहे. त्याच्या या फीच्या आकड्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोमधून सुरुवात करणारा कपिल शर्मा आता टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारा ‘कॉमेडियन किंग’ बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलने या शोच्या ५ एपिसोडसाठी तब्बल २६ कोटी रुपये मानधन आकारले आहे. कपिल शर्मा गेल्या १० वर्षांपासून ‘द कपिल शर्मा शो’ हा शो होस्ट करताना दिसला आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा एका एपिसोडसाठी जवळपास ५० लाख रुपये फी घेत होता. त्याच्याकडे एका महिन्यात ८ एपिसोड असायचे, ज्यासाठी कपिल शर्मा याला तब्बल ४ कोटी रुपये मिळायचे.

अन्नू कपूरला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी केली अटक! मोठा घोटाळा आला समोर

इतर कलाकारांचे मानधन

सुनील ग्रोव्हर: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये परतला आहे. ७ वर्षांनंतर सुनील आणि कपिल एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील ग्रोव्हरने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडसाठी जवळपास २५ लाख रुपये फी आकारली आहे.

कृष्णा अभिषेक: अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक देखील कपिल शर्माच्या नवीन शोमध्ये एका नवीन पात्रासह परतला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये तो ‘छोटे भैया’ची भूमिका साकारताना दिसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने एका एपिसोडसाठी १२ लाख रुपये फी आकारली आहे.

ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला घेऊन परदेशी स्थायिक होणार?

अर्चना पूरण सिंह: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या जज अर्चना पूरण सिंहही कमाईच्या बाबतीत मागे नाहीत. ‘द कपिल शर्मा’ शोसाठी प्रती एपिसोड १० लाख घेणाऱ्या अर्चना पूरण सिंहने यावेळीही भरमसाठ फी घेतली आहे.

तर, अभिनेता किकू शारदाने एका एपिसोडसाठी ७ लाख रुपये आणि राजीवने सुमारे ६ लाख रुपये मानधन आकारले आहे.

IPL_Entry_Point

विभाग