भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे कायमच चर्चेत असतात. त्यांची हटके स्टाईल तसेच त्यांचा स्पष्ट वक्तव्यपणा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाची कामगिरी बजावणारे कपिल देव पत्नीसोबत रोमँटिक झाले आहेत. त्यांचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कपिल देव हे जसे त्यांच्या भेदक गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात तसेच ते त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठीही परिचित आहेत. सोशल मीडियावर कपिल देव यांचा पत्नी रोमीसोबत गुलाबी ऑखे जो तेरी देखी... या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.
वाचा: “काय तमाशा लावलाय”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील सुरुचीचा नागिण अवतार पाहून नेटकरी संतापले
कपिल देव यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ६ जानेवारी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. देशभरातील चाहत्यांनी कपिल देव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये कपिल देव पत्नीसोबत रोमँटिक झाले. त्या दोघांचा 'गुलाबी आखे जो तेरी देखी' गाण्यावरील रोमँटिक डान्स पाहून चाहते खूश झाले आहेत.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली झालेल्या विश्वचषकावर स्वत:चे नाव कोरले. त्यानंतर जगभरात भारतीय संघाचा दबदबा निर्माण झाला. त्यानंतर १९७८ मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या सामन्यातून डेब्यू केले होते.