मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चक्क अंतर्वस्त्र परिधान करून अभिनेत्री गेली शॉपिंगला
जूलिया फॉक्स
जूलिया फॉक्स (HT)
21 May 2022, 5:08 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 5:08 AM IST
  • अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कलाकार हे नेहमीच त्यांच्या ग्लॅमरस लूक आणि हटके अंदाजासाठी ओळखले जातात. ते डिनर डेटला जाताना किंवा घराबाहेर पडताना नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसतात. पण कधी कधी काही कलाकार अतरंगी रुपात देखील दिसतात. नुकताच एक अभिनेत्री अंतर्वस्त्र परिधान करुन शॉपिंगला गेली होती. तिचे शॉपिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या अभिनेत्रीचे नाव जूलिया फॉक्स आहे. ती एक इटालियन-अमेरिकन मॉडेल असून एक अभिनेत्री आहे. सध्या जूलिया ही चर्चेत आहे. कारण जूलिया केवळ अंतर्वस्त्र परिधान करुन शॉपिंगला गेली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चर्चेत आहेत.

जूलियाने काळ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले होते. त्यावर तिने लांब डेनिम जॅकेट परिधान केले होते. तिच्या हातात असलेली बॅग देखील थोडी हटके आहे. पाहणाऱ्यांसाठी हा थोडा हटके लूक असला तरी जूलियाने अगदी सहज तो कॅरी केला होता. तिने स्वत: या लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook