Bianca Censori Clothes At Grammys 2025 : ग्रॅमी अवॉर्ड्स हा संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. या सोहळ्यात संगीताचे सूरही ऐकायला मिळतात आणि रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा देखील पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लॉस एंजेलिसमध्ये ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.
या दिमाखदार कार्यक्रमात काही स्टार्स ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आले, तर काहींनी आपल्या फॅशनने सगळ्यांना थक्क केले. यावेळी काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खास लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे कान्ये वेस्टची पत्नी बियान्का सेन्सोरी .
गायक, रॅपर कान्ये वेस्टची पत्नी बियान्का सेन्सरी ही मॉडेलिंगच्या जगातील मोठे नाव आहे. यंदा तिने पती आणि अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टसोबत संगीत विश्वातील कलाकारांना सन्मान देणाऱ्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान बियान्काने तिच्या न्यूड लूकने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला.
बियान्का सेन्सरी आणि कान्ये वेस्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, बियान्का तिच्या पतीसोबत ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चालताना पापाराझींसमोर पोझ देत असल्याचे दिसत आहे. रेड कार्पेटवर येण्यापूर्वी तिने काळ्या रंगाचे लाँग जॅकेट परिधान केले होते. पण, कॅमेरासाठी पोझ देण्याची वेळ येताच तिने सगळ्यांसामोर जॅकेट काढले.
या कार्यक्रमात बियान्का सेन्सारीने इतका पारदर्शक ड्रेस परिधान केला होता की, त्यातून तिचे संपूर्ण शरीर दिसत होते. तिचा हा लूक पाहून सगळेच थक्क झाले. आता असे बोलले जात आहे की, मॉडेल बियान्का सेन्सरी आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांना ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तिथूनच थेट बाहेरचा रस्ता दाखवला. टेलिचक्करच्या वृत्तानुसार, कान्ये वेस्ट आणि बियान्का यांना ग्रॅमी पुरस्कारांसाठी कोणतेही आमंत्रण देखील मिळाले नव्हते. मात्र, आता ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.
ऑस्ट्रेलियन मॉडेल बियान्का हिने २०२२मध्ये अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टशी लग्न केले. ३० वर्षांची बियान्का तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. याआधीही ती आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली होती.
संबंधित बातम्या