मनोरंजन सृष्टीतून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवण्णाचे निधन झाले आहे. शोभिता 'मंगला गौरी' आणि 'कृष्णा रुक्मिणी' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. टीव्हीव्यतिरिक्त शोभिताने चित्रपटांमध्येही काम केले आहे. शोभिता रविवारी हैदराबादमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळला. शोभिताच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता शोभिताच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
शोभिता शिवण्णाच्या निधनानंतर तिची शेवटची पोस्ट चर्चेत आहे. तिने १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक गायक 'इंतेहा हो गई इंतजार की...' हे गाणं गात आहे. या व्हिडिओसोबत अभिनेत्रीने गिटार आणि म्युझिकचे इमोजी शेअर केले होते.
हैदराबादमधील गाचीबावली येथील श्रीराम नगर कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये शोभिता शिवण्णा राहात होती. या राहत्या घरातच तिने आत्महत्या केली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शोभिताच्या मृत्यूची माहिती समोर आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना शोभिताच्या आत्महत्येचा संशय व्यक्त केला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिनेत्रीच्या मृत्यूसंदर्भातील सर्व संशयास्पद बाबींचा तपास केला जात आहे.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
शोभिता 'प्रयत्न टू मर्डर' आणि 'जॅकपॉट' सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिचा अभिनय आणि सौंदर्य प्रेक्षकांची मने जिंकत होते. तिने 'मंगला गौरी' आणि 'कृष्णा रुक्मिणी' या दोन मालिकांमध्ये ही काम केले आहे.
संबंधित बातम्या