Kanguva Box Office Collection Day 1: तमिळ सुपरस्टार सूर्याचा 'कंगुवा' हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये आधीच उत्सुकता होती. चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरने आधीच लोकांमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हा उत्साह कायम असून त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये दिसून आला आहे. कामाचा दिवस असूनही चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी चित्रपटगृहांमध्ये झाली होती. या चित्रपटात सूर्याशिवाय बॉबी देओल आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. तसे, हा चित्रपट पूर्णपणे ‘सूर्या’ची कथा असल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तगडी कामगिरी आहे.
सूर्या केवळ दक्षिण भारतातच नाही, तर हिंदी पट्ट्यातही खूप लोकप्रिय आहे आणि त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईतून दिसून येतो. काल प्रदर्शित झालेल्या 'कंगुवा'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी २२ कोटींची कमाई केली आहे. या उत्पन्नात थोडी वाढ होऊ शकते. ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यात तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीचा समावेश आहे.
या चित्रपटाला २डी आणि ३डी दोन्ही मोडमध्ये सर्वाधिक तेलुगू दर्शक मिळाले आहेत. एकूण तामिळ कलेक्शनपैकी ३७.२५ टक्के कलेक्शन झाले आहे. सूर्याच्या लोकप्रियतेचा हा परिणाम आहे. त्याने आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याशिवाय हिंदीत या चित्रपटाने ११.४७% कलेक्शन केले आहे. हा चित्रपट पाहणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी तेलुगु भाषेत होती. तेलुगू भाषेतील या चित्रपटाने ५८.१२% कलेक्शन केले आहे. त्यात कन्नडमध्ये १५.४९ टक्के आणि मल्याळममध्ये २१.७८ टक्के कलेक्शन आहे आहेत. हे सर्व आकडे Sacnilkच्या रिपोर्टवर आधारित आहेत.
‘कंगुवा’ हा चित्रपट कोरटला शिवा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये सुर्या, दिशा पटानी, बॉबी देओल आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर आगामी काळात चित्रपटाची कमाई वाढणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चित्रपटाची कमाई मोठी उसळी घेऊ शकते.