बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होता. आज १४ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
कंगना रणौतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये दिग्गज कलाकार दिसत असून आणीबाणीची परिस्थिती दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला कंगना रणौत पंतप्रधान कार्यालयाच्या आत एण्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडला 'सरकार असे निवडा जे तुमच्यासाठी कठोर आणि योग्य निर्णय घेऊ शकते, ज्यांच्याकडे ताकद आहे' हा डायलॉग ऐकू येत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखाही दाखवण्यात आली आहे. तसेच शिमलाशी झालेल्या कराराची चर्चा सुरु असते. आणीबाणी घोषिक केल्यानंतर देशात एकंदरीत काय परिस्थिती निर्माण होते हे दाखवण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणाऱ्या कंगनाच्या तोंडून, 'नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे इस देश से' हा डायलॉग लक्ष वेधताना दिसतो.
कंगनाने हा ट्रेलर शेअर करताना, इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया!! देशाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला, इतिहासात लिहिलेला सर्वात काळा अध्याय' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
कंगनाशिवाय 'इमर्जन्सी' चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. तर अशोक छाब्रा मोरारजी देसाई, महिमा चौधरी पुपुल जयकर, सतीश कौशिक जगजीवन राव यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण, संजय गांधींच्या भूमिकेत विशाक नायर, अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे दिसणार आहे.
वाचा: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
'इमर्जन्सी' हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत