बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या कलाकार यामध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहिर करण्यात आली आहे.
कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'इमर्जन्सी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर केली आहे. "स्वतंत्र भारताच्या सर्वात काळ्या अध्यायाच्या ५०व्या वर्षानिमित्त, कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' ६ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करत आहेत. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना" असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे
कंगनाच्या या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत. एका यूजरने पोस्टरवर कमेंट करत 'कंगना हा चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे,' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कंगना रणौतला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळू शकतो, असे म्हणत कौतुक केले आहे. मात्र, तिसऱ्या एका यूजरने 'हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच फ्लॉप ठरेल' असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने 'कंगनाचा आणखी एक फ्लॉप चित्रपट येणार' असे म्हटले आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर
कंगना रणौतच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास तीन वेळा असे करण्यात आले. हा चित्रपट ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. त्यानंतर ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यापाठोपाठ १४ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. आता या प्रदर्शनाची तारीख ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.
वाचा : अद्वैतने सर्वांसमोर कलाच्या गळ्यात घातले मंगळसूत्र, आजच्या भागात काय घडणार?
'इमर्जन्सी' हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत
संबंधित बातम्या