मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Emergency Release Date: "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया", 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

Emergency Release Date: "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया", 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 03:08 PM IST

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या कलाकार यामध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच कंगनाने तिचा आगामी चित्रपट इमर्जन्सी'शी संबंधीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया" हा डायलॉग हिट होताना दिसत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.
वाचा: "प्रत्यक्ष ईश्वराला आपण जेव्हा पाहतो...", राम मंदिरातील श्रीरामाची मूर्ती पाहून मनोज जोशींची प्रतिक्रिया

व्हिडीओच्या सुरुवातीला २५ जून १९७५ ही तारीख दाखवण्यात आली आहे. त्यानंतर काही लोकांचा घोळका दगडफेक करताना दिसतो. त्यापाठोपाठ एका वर्तमानपत्रात आणीबाणीची घोषणा केल्याची हेडलाइन दिसते. चित्रपटात जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणारे अनुपम खेर हे तुरुंगात दिसतात. ते "सरकार राज नाही अहंकार राज है ये" असा डायलॉग मारताना दिसतात. तसेच व्हिडीओच्या शेवटी कंगना 'मुझे इस देश की रक्षा करने से कोई नहीं रोक सकता, क्यूंकी इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया' हा डायलॉग बोलताना दिसते.

कंगनाने हा व्हिडीओ शेअर करत "भारतातील सर्वात डार्क कथा अनलॉक करा. १४ जून २०२४ रोजी इमर्जन्सी येत आहे" असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच कंगनाचा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'इमर्जन्सी' हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत

WhatsApp channel

विभाग