मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: कंगना रणौतला व्हायचे पंतप्रधान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Kangana Ranaut: कंगना रणौतला व्हायचे पंतप्रधान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 11, 2024 10:02 AM IST

Kangana Ranaut To Become Prime Minister: कंगना रणौतने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारताची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. तिचे 'धाकड', तेजस आणि चंद्रमुखी २ हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होताना दिसले. आता कंगनाचा लवकरच 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आहे. तिने भारताची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कंगना रणौत सध्या तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच एका कार्यक्रमामध्ये तिला देशाची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'मी इमरजंसी नावाचा चित्रपट करत आहे. हा चित्रपट पाहिल्यावर कोणीही मला पंतप्रधानांच्या भूमिकेत पाहणार नाही' असे कंगना म्हणाली.
वाचा: शुटिंगला सुरुवात! सचिन पिळगावकरांनी शेअर केला सेटवरचा धम्माल व्हिडिओ

कंगनाच्या चित्रपटाविषयी

'इमर्जन्सी' हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.

कंगना करणार राजकारणात प्रवेश?

देशात २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून भाजपच्या प्रत्येक भूमिकांचं खुलेआम समर्थन करणारी अभिनेत्री कंगना राणावत आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. 'कंगना ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढेल. तिनं कोणत्या जागेवरून निवडणूक लढवायची याचा निर्णय भाजप घेईल, असे कंगनाच्या वडिलांनी सांगितले होते.

कंगनानं तोंडभरून केलं आरएसएसचं कौतुक

कंगना राणावतनं नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. आरएसएसनं देशासाठी खूप काही केलं आहे. आजही देशाला एकसंध ठेवण्याचं काम करत आरएसएस करत आहे. माझी विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखीच आहे. या देशभक्त संघटनेच्या कार्यपद्धतीनं मी प्रभावित झालो आहे. आरएसएसच्या मुशीत तयारे झालेल्या लोकांनी सत्तेवर आल्यानंतर जे काम केलंय, ते ७० वर्षांत होऊ शकलं नाही, असं ती म्हणाली होती. देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतरच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, असंही ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती.

WhatsApp channel

विभाग