मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: नवाजुद्दीनला कंगना रणौतचा पाठिंबा, म्हणाली 'शांत बसणे...'

Kangana Ranaut: नवाजुद्दीनला कंगना रणौतचा पाठिंबा, म्हणाली 'शांत बसणे...'

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 07, 2023 08:33 PM IST

Nawazuddin Siddiqui-Aaliya Siddiqui : नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत नवाजने आपल्याला मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. त्यावर नावजने दिलेल्या उत्तरावर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना आणि नवाजुद्दीन
कंगना आणि नवाजुद्दीन (HT)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याच्या पूर्व पत्नी आलिया सिद्दीकीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत नवाजने आपल्याला मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. आलिया सिद्दीकीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, तिचे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हणत आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या टीमने एक निवेदन जारी केले. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतने नवाजला पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने नवाजने शेअर केलेले निवेदन पुन्हा शेअर केले आहे. ते शेअर करत त्याने, 'न बोलल्यामुळे शांतता मिळत नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी साहेब, तुमचे चाहते आणि तुमचे चांगले पाहू इच्छिणाऱ्यांना तुमची बाजू जाणून घ्यायची आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: आशुतोषने अरुंधतीसाठी घेतला खास उखाणा Video Viral

काय आहे नवाजचे निवेदन?

नवाजुद्दीन सिद्दीकीने दिलेल्या या स्टेटमेंटमध्ये त्याने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या निवेदनात म्हटले की, ‘मी आणि आलिया गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे. परंतु, आम्ही आमच्या मुलांसाठी कधीतरी एकत्र असतो. मात्र, गेल्या ४५ दिवसांपासून आलियाने माझ्या मुलांना भारतात आणून कैद करून ठेवले आहे. गेल्या ४५ दिवसांपासून माझी मुलं शाळेत गेलेली नाहीत. त्यांच्या दुबईतील शाळेतून मला सतत पत्र येत आहेत.’

पुढे नवाज म्हणतो की, ‘आलियाने आमच्या मुलांना तब्बल ४ महिने दुबईसारख्या शहरात एकटं सोडलं होत आणि इथे पैशाची मागणी करत होती. गेल्या २ वर्षांपासून आलियाला मुलांच्या खर्चासाठी दरमहिना जवळपास १० लाख रुपये दिले जात आहे. तर, दुबईला जाण्यापूर्वी देखील दरमहिना ५ ते ७ लाख रुपये दिले जायचे. या खर्चात मुलांच्या शाळेची फी, मेडिकल आणि प्रवास खर्च वेगळा दिला जात होता. याशिवाय तिच्या ३ चित्रपटांसाठी मी कोट्यवधीचे भांडवल दिले आहे. ती माझ्या मुलांची आई आहे आणि तिने तिच्या आयुष्यात आता स्थिर व्हावे या विचाराने मी तिची मदत केली.’

पत्नीचे आरोप फेटाळून लावताना नवाज म्हणाला की, ‘मी मुलांच्या सोयीसाठी तिला अनेक लक्झरी कार दिल्या होत्या. मात्र, त्या विकून तिने पैशांची उधळपट्टी केली. मी आमच्या मुलांसाठी वर्सोवामध्ये एक सीफेसिंग घर देखील घेतले होते. मात्र, मुलं लाहान असल्याने ते घर आलियाच्या नावावर आहे. यानंतर मी मुलांना दुबईमध्ये एक लक्झरी घर घेऊन दिले. या घरात आलिया देखील आरामात राहत आहे. तिला केवळ पैसा हवा आहे, म्हणून ती असे आरोप करत आहे. माझी मुलं मुंबईत सुट्टीसाठी येतात, तेव्हा ती त्यांच्या आजीसोबतच राहतात. मुलांना कधीच घराबाहेर काढलं गेलं नाही. मी त्यावेळी घरात नव्हतो, तेव्हाच हा व्हिडीओ बनवला गेला. मला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी आलिया मुलांना या प्रकरणात ओढत आहे.’

WhatsApp channel

विभाग