बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. आजकाल तिचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीत. कंगना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीचा हा पकडताना दिसत आहे.
कंगना शुक्रवारी एका सलॉनमध्ये गेली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सने तिला स्पॉट केले. यावेळी कंगनाने आकाशी रंगाचा टॉप घातला आहे. तसेच केस मोकळे सोडून डोळ्याला गॉगल लावलेला आहे. कंगनासोबत असलेल्या मिस्ट्री मॅनने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत 'हा कंगना तुझा बॉयफ्रेंड आहे का?' असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तुझ्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे?' असा प्रश्न विचारला आहे. 'आता क्वीन खूश असेल' अशी कमेंट तिसऱ्या एका यूजरने केली आहे.
काही वर्षांपूर्वी कंगना ब्रिटीश डॉक्टर निकोलस लाफर्डीला डेट करत होती. निकोलसला कंगनाशी लग्न करायचे होते. मात्र, त्यावेळी कंगनाचे वय केवळ २५ वर्षे होते आणि तिचे लक्ष करिअरवर केंद्रीत होते. तिचे निकोलसवर प्रेम होते. पण तिला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आता कंगनाच्या आयुष्यातील ही नवीन व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संबंधित बातम्या