मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral News: कंगना रनौतच्या कानाखाली आवाज काढणारी महिला जवान नोकरीवर परतली? काय आहे सत्य?

Viral News: कंगना रनौतच्या कानाखाली आवाज काढणारी महिला जवान नोकरीवर परतली? काय आहे सत्य?

Jul 03, 2024 07:14 PM IST

Kangana Ranaut Slapped Case: चंदीगड विमानतळावर कंगना रनौतवर हात उचलणारी सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर हिला माफ करण्यात आल्याची एक मोठी बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती.

कंगना रनौतच्या कानाखाली आवाज काढणारी महिला जवान नोकरीवर परतली?
कंगना रनौतच्या कानाखाली आवाज काढणारी महिला जवान नोकरीवर परतली?

Kangana Ranaut Slapped Case: बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला कानाखाली मारण्यात आल्याची घटना आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चंदीगड विमानतळावर कंगना रनौतवर हात उचलणारी सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर हिला माफ करण्यात आल्याची एक मोठी बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. कंगनाने माफी मागितल्यानंतर कुलविंदर कौरला कामावर परत घेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यासोबतच कुलविंदर कौरबाबत इतरही अनेक दावे करण्यात आले होते. मात्र, यामागचं सत्य आता समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात होता की, कुलविंदर कौरला तिची नोकरी परत मिळाली आहे, पण आता ती चंदीगड विमानतळावर काम करणार नाही, तर दुसरीकडे कुठेतरी काम करणार आहे. कुलविंदर कौर आणि तिच्या पतीच्या बदलीच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. कंगनाला थप्पड मारल्यानंतरही महिला जवानाला कामावर परत ठेवण्यात आले आहे, पण तिची बदली बंगळुरूला करण्यात आली आहे, ही बातमी सर्वत्र तुफान व्हायरल झाली होती. मात्र, आता खुद्द सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांनीच या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याच खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कुलविंदर कौर यांनी बदलीबाबत सोडले मौन

आता सर्वत्र तुफान व्हायरल होत असलेल्या या बदलीच्या वृत्तावर खुद्द कुलविंदर कौर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी स्वतः समोर येत सत्य उघड केले आहे आणि सर्व दावे फेटाळून लावले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर यांची कोणतीही बदली झालेली नाही. म्हणजेच त्यांची बंगळुरू विमानतळावर बदली झालेली नाही. एवढेच नाही तर, बदलीची चर्चा आणि हे वृत्त खोटे असून, नोकरी परत मिळाल्याचे दावेही बिनबुडाचे आहेत.

सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौरला नोकरी परत मिळाली?

आता खुद्द कुलविंदर कौरने खुलासा केला आहे की, त्या अजूनही निलंबित आहे. एवढेच नाही तर, त्यांच्याविरुद्ध चौकशी अजूनही सुरू आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या पुन्हा नोकरीवर रुजू होणार नसून, बदलीची चर्चा अद्याप लांबच आहे. सदर प्रकारणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कुलविंदर कौर यांचे भवितव्य ठरणार आहे. अद्याप त्यांना नोकरीवर परत घेण्यात आलेले नाही.

WhatsApp channel