भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सतत चर्चेत असते. कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे. सध्या कंगना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कंगनाने तिचा मुंबईतील पाली हिल्स परिसरातील बंगला विकला आहे. या बंगल्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
कंगनाने पाली हिल्स परिसरातील हा बंगला २०१७मध्ये खरेदी केला होता. तिने हा बंगला २० कोटी रुपयांना खरेदी केला होता. कंगनाचा हा आलिशान बंगला ३०७५ क्वेअर फूटमध्ये आहे. तसेच हा बंगल्याला ५६५ क्वेअर फूटचा पार्किंग स्लॉट देण्यात आला आहे. कंगानाने आता हा आलिशान बंगला आहे. तिने हा बंगला ३२ कोटी रुपयांना विकला आहे. म्हणजे जवळपास १२ कोटी रुपयांचा कंगनाला नफा झाला आहे.
कंगनाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी हा बंगला आहे. या व्यवहाराची योग्य ती नोंदणी करण्यात आली आहे. या बंगल्याच्या विक्रीसाठी कंगनाने १ कोटी ९२ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. तसेच ३० हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून भरावे लागले आहे. कंगनाचा हा बंगला श्वेता बथिजाने खरेदी केला आहे. श्वेता ही कमलिनी होल्डिंग्सची भागीदार असून तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील रहिवासी आहे.
मुंबईतील पाली हिल्स हा असा परिसर आहे जेथे अनेक बॉलिवूड कलाकार आणि श्रीमंत लोक राहतात. तेथे प्रति चौरस फूट एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमत आहे. त्यामुळे अनेकांचे हा भागात घर घेण्याचे स्वप्न असते. पाली हिलमध्ये दिवंगत अभिनेते सुनील आणि नर्गिस दत्त, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंह, गुलजार, इम्रान खान, आमिर खान, संजय दत्त यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार राहतात.
वाचा: बिग बॉस मराठीने बदलले शिव ठाकरेचे आयुष्य! किती रुपये मिळाले बक्षीस?
कंगना रणौतने नुकताच मुंबईतील अंधेरी येथील भागात एक ऑफिस खरेदी केले आहे. यासाठी तिने १.५६ कोटी रुपये मोजले आहेत. तिचे हे ऑफिस आर्च वन नावाच्या एका इमारतीमध्ये १९व्या फ्लोअरवर आहे. तिचे हे ऑफिस ४०७ चौरस फुटामध्ये आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कंगना रणौतने मे २०२४ मध्ये ९१ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामध्ये २८.७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ६२.९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.