EMERGENCY: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!-kangana ranaut s upcoming emergency film in trouble plea filed in high court to stay on release ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  EMERGENCY: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

EMERGENCY: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

Aug 28, 2024 08:17 AM IST

Kangana Ranaut Emergency Movie: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानंतर नव्या अडचणीत सापडली आहे. तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

kangana ranaut film emergency: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत
kangana ranaut film emergency: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत

Kangana Ranaut Emergency Movie: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानंतर नव्या अडचणीत सापडली आहे. तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाला पंजाबमध्ये जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटात शिखांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याने शीख संतप्त झाले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायदेशीर अडचणीतही अडकला आहे. वकील इमान सिंग खारा यांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इमान सिंह खाना हे आसाम डेलमध्ये बंद असलेले खासदार अमृतपाल सिंह यांचे वकील आहेत.

वकील इमान सिंह खारा म्हणाले की, या चित्रपटात शिखांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. या याचिकेवर एक-दोन दिवसांत सुनावणी होऊ शकते. विशेष म्हणजे याचिकाकर्ते इमान खारा हे आसामच्या दिब्रुगड तुरुंगात असलेले खासदार अमृतपाल सिंह यांचे वकील आहेत. त्याचवेळी बठिंडायेथील नाट्यगृहाबाहेर शिखांनी निदर्शने केली. त्यांनी कंगनाचा पुतळा जाळला. या चित्रपटावर बंदी घालावी, असे शिख समुदायाचे म्हणणे आहे.

शीख समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न

या याचिकेत म्हटले आहे की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर असे दिसून येत आहे की, हा चित्रपट शीख समुदायाबद्दल द्वेष आणि हिंदू व शीख यांच्यातील वैर वाढवणारा आहे. यात शिखांना दहशतवादी म्हणून दाखवले जात आहे. शीख समुदाय आणि तेथील धार्मिक संस्थांना बदनाम करण्याचा हा केवळ डाव आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे शीख आणि हिंदू समाजातील बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी नष्ट होऊ शकते. विशेषत: पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला प्रदर्शनासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश द्यावेत.'

सलमान खान आणि कंगना रनौत टीव्हीवर भिडणार, बिग बॉस आणि लॉकअप एकाच दिवशी प्रदर्शित होणार?

कंगनाला जीवे मारण्याची धमकी

यापूर्वी कंगनाला विकी थॉमस मसीहने २६ ऑगस्ट रोजी शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये विकी थॉमस म्हणाला की, ‘इतिहास बदलता येत नाही. दहशतवादी म्हणून दाखवले तर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ज्याचा चित्रपट करत आहे, त्याची काय सेवा असेल. जे सतवंतसिंग आणि बेअंत सिंग (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडणारे) होते, त्यांच्या भूमिकाही पाहायला तयार राहा. हे मी मनापासून बोलत आहे, कारण आमच्याकडे जी काही बोट दाखवली जातील, ती आम्ही कापतो. संत जरनैलसिंग भिंडरावाला यांच्यासाठीही आम्ही स्वतःचाही शिरच्छेद करू शकतो आणि दुसऱ्याचंही कापू शकतो.’ धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने हिमाचल पोलीस आणि मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती.

कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर बनला आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबचे अपक्ष खासदार सरबजीत सिंग खालसा यांनी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर सर्वप्रथम आक्षेप घेतला होता.