मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे, पण...’

चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे, पण...’

Jun 07, 2024 08:07 AM IST

गुरुवारी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कमर्चारीने कंगना रनौतला जोरदार थप्पड मारली. यावर आता अभिनेत्री-राजकारणी कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपण सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.

चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया!
चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया!

अभिनेत्री कंगना रनौतसोबत चंदीगड विमानतळावर गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. केंद्रीय उद्योग सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महिला कर्मचारीने तिला थप्पड मारल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, तिने तत्काळ सोशल मीडियावरून या घटनेची दखल घेतली आणि एक निवेदन प्रसिद्ध करून आपल्या चाहत्यांना आणि जनतेला आपण सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.

ट्रेंडिंग न्यूज

काय म्हणाली कंगना?

कंगनाने काय घडले याचा तपशील देखील सांगितला. एका व्हिडीओ स्टेटमेंटमध्ये तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर काय घडले याची माहिती दिली आहे. आपण सुरक्षित असल्याची ग्वाही देतानाच तिने पंजाबमधील कथित बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधले. ती म्हणते, “नमस्कार मित्रांनो. प्रसारमाध्यमे आणि माझ्या हितचिंतकांकडून मला असंख्य फोन येत आहेत. सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छिते की मी सुरक्षित आहे आणि मी पूर्णपणे ठीक आहे.”

या व्हिडीओत ती पुढे म्हणाली की, "आज चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीत एक घटना घडली. माझी सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर मी सीआयएसएफच्या एका जवानाच्या पुढे जात असताना तिने माझ्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. ती माझ्यावर चिडली होती. मी तिला असं का करत आहेस, असं देखील विचारलं. तेव्हा ती म्हणाली की, ती शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे.'

Kangana ranaut : १०० रुपयांसाठी कंगनाने कानाखाली खाल्ली, CISF महिला जवान म्हणाली..

कंगनाने पंजाबबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले की, ‘मी सुरक्षित आहे, परंतु मला आता चिंता वाटत आहे की, पंजाबमध्ये वाढत असलेल्या दहशतवाद आणि अतिरेकाला तुम्ही कसे हाताळाल? धन्यवाद’.

सीआयएसएफच्या महिला जवानाने कंगनाला थप्पड मारली!

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंडीमधून निवडून आलेल्या खासदार कंगना रनौतने आपला फोन ट्रेमध्ये ठेवण्यास नकार दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला धक्काबुक्की केली. यानंतर सीआयएसएफच्या एका महिला कर्मचारीने कंगनाला थप्पड मारली. कंगना दुपारी ३ वाजता विस्ताराच्या विमानाने मंडीहून दिल्लीला रवाना झाली होती. हल्ल्यानंतर विमानतळावरील कंगनाचा एक व्हिडीओही एक्सवर व्हायरल झाला होता.

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तिच्यासोबत आता ही घटना घडली. या जागेवर तिने काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला.

कंगना रनौतबद्दल…

कंगनाने वयाच्या १७व्या वर्षी अनुराग बसूच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’, ‘फॅशन’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि शेतकरी आंदोलनासारख्या राजकीय मुद्द्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४