मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: ‘पठाण’चा धुमाकूळ पाहून कंगनाचा युटर्न! शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाली...
Kangana-Shah Rukh Khan
Kangana-Shah Rukh Khan

Kangana Ranaut: ‘पठाण’चा धुमाकूळ पाहून कंगनाचा युटर्न! शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाली...

27 January 2023, 15:37 ISTHarshada Bhirvandekar

Kangana Ranaut on Pathaan: कंगनाने तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत शाहरुख खानचे कौतुक केले आहे.

Kangana Ranaut on Pathaan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून, शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. किंग खानच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. त्यात आता कंगना रनौतची देखील भर पडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कंगनाने तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत शाहरुख खानचे कौतुक केले आहे. मीडियाशी बोलताना कंगना म्हणाली की, ‘पठाण’ चित्रपटाला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळावा अशी तिची इच्छा आहे आणि तिने पठाण चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. कंगना म्हणाली की, 'पठान बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटांना प्रेक्षकांकडून असा चांगला प्रतिसाद मिळायला हवा.  चित्रपट चांगला चालावा म्हणून चित्रपटसृष्टीतील सगळेच लोक मेहनत  घेत आहेत. खूप प्रयत्न देखील करत आहे. बॉलिवूड चित्रपट चालायलाच हवेत असे मला वाटते.’

या आधी कंगना रनौतने सलमान, शाहरुख आणि आमिर खानसोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या खान स्टार्सपेक्षा मी चांगली अभिनेत्री आहे, असे वक्तव्य तिने केले होते. कंगना रनौत ही सलमानची चांगली मैत्रीण आहे. तरीदेखील कंगना सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली नव्हती. तर, या आधी कंगनाने ‘पठाण’वर देखील टीका केली होती. मात्र, आता तिने थेट युटर्न घेत ‘पठाण’चे कौतुक केले आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमर आणि स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. दीपिकाशिवाय जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले. त्याचबरोबर या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते खूप खूश आहेत. एकीकडे या चित्रपटाला समीक्षक आणि सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई झाली आहे.