मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: कंगना रणौतचा आणखी एक सिनेमा फ्लॉप? पहिल्याच दिवशी 'तेजस'ची निराशाजनक कमाई

Kangana Ranaut: कंगना रणौतचा आणखी एक सिनेमा फ्लॉप? पहिल्याच दिवशी 'तेजस'ची निराशाजनक कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 28, 2023 11:49 AM IST

Tejas Box Office Collection : यापूर्वी कंगना रणौतचा 'धाकड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नव्हता.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

बॉलिवूडची 'पंगा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतचा 'तेजस' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटात कंगनाने महिला वैमानिकेची भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तेजस' या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नुकताच समोर आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी जवळपास १३०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अनेक ठिकाणी चित्रपटाचे अडवान्स बुकींग करण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी चित्रपटाने १ कोटी २५ लाख रुपयांचा गल्ला जमावल्याचे समोर आले आहे.
वाचा: मोठं "कांड" होणार! 'सेक्स्टॅार्शन'वर भाष्य करणारी सीरिज येणार मराठीमध्ये

'तेजस' या चित्रपटात कंगनासोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशीष विद्यार्थी आणि विशाख नायर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. सर्वेश मारवाहने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

यापूर्वी कंगनाचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले. 'तेजस' या चित्रपटाकडून सर्वांना अपेक्षा होता. मात्र चित्रपट अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

कंगनाच्या इतर चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर 'इमरजेंसी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच नुकताच तिचा ‘चंद्रमुखी २’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात टेरेन्स हा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग