Kangana Ranaut Meet Bageshwar Dham: अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा आज होत आहे. या भव्यदिव्य सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत एक दिवस आधीच अयोध्येला पोहोचली होती. यावेळी ती तिच्या प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत होती. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त कंगनाने इतर धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिने जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराला भेट दिली आणि परिसरात झाडू देखील मारली. नुकतीच तिने बागेश्वर धाम यांचीही भेट घेतली.
अयोध्येत पोहोचलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. त्यांना देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही मिळाले आहे. कंगना रनौतने त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून, त्यांना आपल लहान भाऊ म्हटले आहे. पहिल्यांदाच आपल्या वयापेक्षा लहान गुरू मिळाला, असे देखील यावेळी कंगना रनौत हिने म्हटले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत इतर अनेक साधूसंत दिसत आहेत.
कंगनाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी पहिल्यांदा माझ्या वयापेक्षा लहान गुरुजींना भेटत आहे. ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मला त्यांना लहान भावाप्रमाणे मिठी मारावीशी वाटली. पण नंतर मला लक्षात आले की, कुणीही वयाने गुरु होत नाही, कर्माने गुरु बनतो. यावेळी गुरुजींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. जय बजरंग बली.’
कंगना रनौत अयोध्येतून अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत आहे. प्राण प्रतिष्ठा महोत्सवात ती पाहुणी सामील झाली आहे. यावेळी कंगना रानौत हिने एक सुंदर साडी नेसली आहे. या साडीत कंगना रनौत खूप सुंदर दिसत आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक साधू-मुनींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये कंगना हनुमान गढी मंदिर परिसरात झाडू मारताना दिसली होती. दुसर्या एका क्लिपमध्ये ती कैलाशानंदजींचे प्रवचन ऐकताना दिसली आहे. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. एका फोटोत कंगना त्याच्यासोबत बसलेली दिसली आहे.