Kangana Ranaut Restaurant : अभिनेत्री कंगना रनौत एक चांगली अभिनेत्री आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय ती एक चांगली दिग्दर्शिका देखील आहे आणि आता राजकारणातही आली आहे. पण, यादरम्यान अभिनेत्रीने आपले रेस्टॉरंट उघडून सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्रीने तिच्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. कंगनाचे हे खूप जुने स्वप्न होते, जे आता तिने पूर्ण केले आहे.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत, एका जुन्या व्हिडिओमध्ये ती अनेक अभिनेत्रींसोबत बसलेली आहे, त्यापैकी एक म्हणजे दीपिका पदुकोण. कंगना म्हणते की, 'मला अशा ठिकाणी रेस्टॉरंट हवे आहे, जे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असेल. तिकडे मी मला जे पदार्थ खायचे आहेत ,ते नक्की बनवेन. माझ्याकडे अनेक उत्तम पाककृती आहेत.' यावर दीपिका म्हणते की, ‘मी तुमची पहिली ग्राहक होईन.’ म्हणूनच आता कंगनाने लिहिले की, ‘दीपिका, तू मला वचन दिलेलेस की, तू माझी पहिली ग्राहक बनशील.’
एका व्हिडिओमध्ये कंगना म्हणते की, ‘मला अनेक गोष्टी करायच्या आहेत, मी पटकथा लिहिली आहे, मला दिग्दर्शन करायचे आहे. मला ही रेस्टॉरंट उघडायचे आहे.’ हा व्हिडिओ शेअर करत आता कंगनाने लिहिले की, ‘अभिनय, लेखन, फिल्ममेकिंग आणि स्वयंपाक, पण राजकारण आमच्या हाताबाहेरचे होते. तुम्ही आयुष्यापेक्षा हुशार होऊ शकत नाही. ते तुमच्यापेक्षा हुशार आहे.’
कंगनाचे रेस्टॉरंट शबाना गुप्ता यांनी डिझाइन केले आहे, ज्यांनी आधी कंगनाची मुंबई आणि नंतर मनाली प्रॉपर्टी डिझाइन केली होती. हे रेस्टॉरंट १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
लाकूड आणि दगडापासून बनवलेला हा कॅफे बराच मोठा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यस्त जीवनापासून दूर शांती देणारी ताजी हवा मिळेल. देखील खूप आरामदायक आहे.
कंगनाच्या फिल्मोग्राफीबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वी तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले होते. आता कंगनाने आर माधवनसोबत तिच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. माधवन आणि कंगना १० वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.
संबंधित बातम्या