छोट्या पडद्यावरील 'लाफ्टर शेफ' हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे. या शोमधील स्पर्धक प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतात. 'लाफ्टर शेफ'मध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, करण कुंद्रा, अली गोनी, अर्जुन बिजलानी, कृष्णा अभिषेक असे अनेक नामवंत टीव्ही कलाकार आहेत. आता बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचत आहेत. अशातच बॉलिवूड क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतनेही भारती सिंगच्या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. दरम्यान, कंगनाने अंकिताची खिल्ली उडवली आहे.
कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये आली होती. यावेळी सेटवर गणपती बाप्पाची भव्य पूजा झाली तसेच भरपूर धमाल ही झाली. इतकंच नाही तर कंगनाने तिची खास मैत्रिण अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचाही मजेशीर पद्धतीने अपमान केला. आता कंगना नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया...
कंगना रणौत 'लाफ्टर शेफ'च्या स्टेजवर पोहोचल्यानंतर स्पर्धक खूप उत्साही दिसत होते. अशातच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये प्रत्येकाला मोदक बनवण्याचे काम देण्यात आले आहे. अशात अंकिता गूळ बारीक करत असते. ते पाहून कंगना तिला विचारते की हे काय करत आहेस? यावर अंकिता तिला सांगते की ती मोदक बनवण्यासाठी गूळ बारीक करत आहे आणि ती तुपातले मोदक बनवणार आहे. हे ऐकून कंगनाने अंकिताची खिल्ली उडवली आहे. ती म्हणाली, 'तुला चहा कसा करायचे हेही माहीत नाही.' हे ऐकून सगळे हसतात.
'लाफ्टर शेफ'चा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कंगना स्पर्धकांनी बनवलेल्या जेवणाची चव चाखते. तिने करण कुंद्रा आणि अर्जुन बिजलानी यांनी बनवलेल्या चव चाखली. यानंतर अंकिताने कंगनाला आपल्या हाताने बनवलेल्या जेवणाची चवही चाखला लावली. यानंतर कंगना जेवण कसे झाले आहे हे सांगताना म्हणाली, 'चव चांगली आहे. असतात ना काही स्वस्त दुकाने आणि महाग दुखाने.' हे ऐकून सगळे हसतात. कृष्णा अभिषेक म्हणतो, 'एवढा मोठा कोळसा टाकू आणि स्वस्त दुकान.'
वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय म्हणाला
कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट ६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. कंगनाशिवाय 'इमर्जन्सी' चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. तर अशोक छाब्रा मोरारजी देसाई, महिमा चौधरी पुपुल जयकर, सतीश कौशिक जगजीवन राव यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण, संजय गांधींच्या भूमिकेत विशाक नायर, अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे दिसणार आहे.