
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शो ‘लॉकअप’ने २०२२मध्ये छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या शोने छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये यंदा ‘बिग बॉस’च्या घरातील मंडळी सहभागी होणार आहेत. आता चाहते या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसली होती. आता हा शो केवळ ओटीटीवर नाही तर छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'लॉक अप' या वादग्रस्त शोची निर्माती एकता कपूर आहे. हा कार्यक्रम आता छोट्या पडद्यावर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. झी टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. श्वेता तिवारीच्या 'मैं हूं अप्राजिता' या मालिकेची जागा आता कंगना रनौतचा 'लॉक अप 2' हा कार्यक्रम घेणार आहे.
वाचा: सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...; लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर करत आकाश ठोसरने केली पोस्ट
आता फॅन्स नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी देखील कंगना रनौत या गेमची होस्ट असणार आहे. गेल्या सीझनमध्ये हा शो १०० दिवस चालला होता. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले होते. पूनम पांडेसारख्या बोल्ड अभिनेत्रीने देखील तिच्या लूकने शोचा पारा वाढवला होता.
संबंधित बातम्या
