शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं-kangana ranaut in trouble jp nadda summoned kangana ranaut who made wrong comments on the farmers agitation ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं

शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं

Aug 30, 2024 09:01 AM IST

Kangana Ranaut In Trouble: भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा होत आहे.

JP Nadda summoned Kangana Ranaut: शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी
JP Nadda summoned Kangana Ranaut: शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी

Kangana Ranaut In Trouble: भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तिच्या या वक्तव्याबाबत मंगळवारी तिची कानउघडणी केल्याचे समोर आले आहे. नुकतेच कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान मृतदेह लटकत असल्याचे वक्तव्य केले होते. या ठिकाणी बलात्कार होत असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजपने तिच्या या वक्तव्यापासून स्वतःला दुर ठेवले आहे. भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने तिच्या वक्तव्यावर म्हटले आहे की, ‘हे कंगनाचे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचे मत नाही.’ कंगना रनौतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलू दिले जात नाही किंवा तिला विधाने करण्याचा अधिकारही नाही, असे भाजपने म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत कंगना रनौत काय म्हणाली?

मंडीची भाजप खासदार कंगना रनौतने शेतकरी आंदोलनाबाबत एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते की, ‘भारतातही बांगलादेशसारखी अराजकता निर्माण होऊ शकते. बाहेरच्या शक्ती देशाच्या आतल्या लोकांच्या मदतीने आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहेत. आमचे नेतृत्व दुबळे असते आणि दूरदृष्टी नसते तर ते त्यांच्या हेतूत यशस्वी झाले असते. येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात मृतदेह लटकत होते. तिथे बलात्कार होत होते. शेतकरी हिताची विधेयके मागे घेतल्यावर संपूर्ण देशाला धक्का बसला. ते शेतकरी आजही तिथे हजर आहेत. हे विधेयक मागे घेतले जाईल, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.’

मोठी बातमी! कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली

कंगनाविरोधात हरियाणात निदर्शने

कंगना रनौतने आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याविरोधात आम आदमी पार्टीच्या हरियाणा युनिटने मंगळवारी निदर्शने केली. कंगनाच्या वक्तव्यावरून भाजपची शेतकऱ्यांप्रती असलेली मानसिकता दिसून येते, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिंद, यमुनानगर आणि पंचकुलासह राज्याच्या विविध भागात निदर्शने केली. कंगना रनौत म्हणाली होती की, जर सर्वोच्च नेतृत्व पुरेसे मजबूत नसते, तर आता रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होणार असून, विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. आपच्या हरियाणा युनिटने फलक घेऊन भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आपच्या हरियाणा युनिटचे प्रमुख सुशील गुप्ता यांनी कंगना रनौतच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली.