सध्या संपूर्ण भारतात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. अनेक सिनेमे हे हिंदीमध्ये डब होऊन प्रदर्शित होताना दिसतात. तसेच बॉक्स ऑफिसवर देखील साऊथचे सिनेमे सर्वाधिक कमाई करताना दिसतात. पण बॉलिवूडमधील कोणताही सिनेमा फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने यामागचे कारण सांगितले आहे. चला जाणून घेऊया कंगना नेमकं काय म्हणाली...
कंगना रणौतने नुकताच अजेंडा आजतकचा या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात कंगनाला अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा फ्रँचायझीच्या प्रचंड यशामागचे कारण नेमकं काय असू शकतं? आणि त्याची तुलना बॉलिवूडमधील व्यावसायिक परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
'पहिले तर मला वाटत नाही की बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमांनी मेनस्ट्रीम होण्याचा ठेका घेतलेला नाही. ते कोणत्याही निकषाने मुख्य प्रवाहातील नाहीत. आमच्या चित्रपटांची व्याख्या भारतीय चित्रपट उद्योग म्हणून केली पाहिजे , एक असा उद्योग ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकांना संबोधित केले जाते, ' असे कंगना म्हणाली.
या कार्यक्रमात पुढे कंगना रणौतने अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमाच्या यशाविषयी देखील वक्तव्य केले आहे. 'बॉलिवूडमधील लोक स्वत:च्या विश्वामध्ये राहतात. मला त्यांच्या पासून समस्या असण्याचे हे एकमेव कारण आहे. कारण ते त्यांच्या विश्वातून कधीही बाहेर येत नाहीत. त्यांना फक्त जिममध्ये जाणे, प्रोटीन शेक घेणे, इंजेक्शन घेण्याची गरज आहे. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. त्यांना सिक्स पॅक अॅब्स, हॉट बेब, बीच, बाईक आणि आयटम नंबर हवे आहेत. त्यांच्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्यांनी रिअॅलिटी चेक करणे अत्यंत गरजेचे आहे ' असे कंगना पुढे म्हणाली.
वाचा : माहिती आहे का राज कपूर यांनी केले आहे 'या' मराठी सिनेमामध्ये काम, अशोक सराफ होते मुख्य भूमिकेत
पुष्पा : द राइज हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो भारतीय यशस्वी सिनेमा ठरला होता. या चित्रपटाने तेलुगूमध्ये १३६ कोटींपेक्षा जास्त आणि हिंदी-डब आवृत्तीमध्ये अतिरिक्त १०६ कोटी रुपयांची कमाई केली. अल्लू अर्जुनचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हिं दी भाषिक पट्ट्यात ही या चित्रपटाला आणि त्याती ल गाण्यांना लोकप्रियता मिळाली.