लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा फैसला आज होणार आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक मतदारसंघात ही अगदी अस्मितेची लढाई झाली आहे. अशातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने निकालापूर्वीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे.
कोणीही विचारले नसताना स्वत:चे मत मांडणारा आणि चित्रपट समीक्षक म्हणवणारा अभिनेता म्हणजे कमाल राशिद खान. बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अभिनंदन केले आहे. देशात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत सुरु आहे. त्यात एक्झिट पोलेच्या आकडेवारीनुसार देशात एनडीएचे सरकार पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?
कमाल राशिद खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत कायमच पुढे जात राहिल. भाजप ३०० ते ३५० जागा जिंकणार. त्यामध्ये कोणीही काहीही करु शकत नाही' या आशयाची पोस्ट केली आहे.
वाचा: मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा
सोशल मीडियावर कमाल खानचे ट्वीट तुफान व्हायरल झाले आहे. एका यूजरने 'याच्याकडे कुणीही लक्ष देत नसले तरी हा बोलत असतो' अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर कमाल आर खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर त्यानंतर त्याने पुन्हा एक पोस्ट केली आहे. 'जेव्हापासून मी भाजप जिंकल्याचे ट्वीट केले आहे, तेव्हापासून अनेकजण मला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्या ट्विटमुळे लोक दुखावली असतील. पण हेच सत्य आहे की पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील' असे त्याने म्हटले आहे.
वाचा: सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!
संबंधित बातम्या