
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार म्हणून अभिनेता नागार्जुन अक्किनेनी आणि अभिनेता कमल हासन हे ओळखले जातात. दोघांनीही अभिनयच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नागार्जुन आणि कमल हासन यांच्यामध्ये एक नाते तयार होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. जाणून घ्या नेमकं काय झाले होते.
कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यला डेट करत होती. त्या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. नागा चैतन्यने समांथाशी लग्न करण्यापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. मीडिया रिपोर्ट्स नुसार, नागा चैतन्य आणि श्रुती हासन २०१३मध्ये एकमेकांना डेट करत होते. २०१३मधील फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत होते. ते दोघे लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, श्रुतीचा बहिण अक्षरामुळे त्यांच्या नात्यात फूट पडल्याचे म्हटले जात आहे. आज अक्षराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हा किस्सा जाणून घेऊया...
वाचा: मनोज वाजपेयी, अनुराग कश्यपच्या चित्रपटांना तगडी टक्कर देणार ‘हा’ मराठी चित्रपट!
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी श्रुती आणि नागा एकत्र शोमध्ये गेले होते. या पुरस्कार सोहळ्याला श्रुतीने परफॉर्मन्स दिला होता. मात्र, अक्षरा आणि नागाला दुसरीकडे जायचे होते. त्यावेळी श्रुतीने नागाला अक्षराला सोडण्यास सांगितले होते. वेळे अभावी नागाला एकट्याला जावे लागले होते. त्यानंतर यावरुन त्या दोघांमध्ये भांडण झाले. नंतर दोघांचा पॅचअप देखील झाला होता.
२०१५मध्ये श्रुतीने नागाच्या वाढदिवशी एक सेल्फी काढला होता. त्यावेळी त्यांच्या पॅचअपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अक्षरामुळे नागा आणि श्रुतीमध्ये झालेल्या वादामुळे त्यांच्या नात्याचा शेवट झाला. २०१६मध्ये ब्रेकअप झाल्यावर नागाची भेट समांथाशी झाली. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी लग्न केले. जवळपास लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.
संबंधित बातम्या
