Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे? अ‍ॅमेझॉन की नेटफ्लिक्स? जाणून घ्या...-kalki 2898 ad ott released on ott but where exactly to watch amazon or netflix know here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे? अ‍ॅमेझॉन की नेटफ्लिक्स? जाणून घ्या...

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे? अ‍ॅमेझॉन की नेटफ्लिक्स? जाणून घ्या...

Aug 22, 2024 08:18 AM IST

Kalki 2898 AD OTT Release Time: ‘कल्की २८९८ एडी’ एकाच वेळी दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत असल्याने आता चाहते आणि प्रेक्षक गोंधळात पडले आहेत.

Kalki 2898 AD OTT Release: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित!
Kalki 2898 AD OTT Release: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित!

Kalki 2898 AD OTT Release: अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अवघ्या जगातील प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने गारुड घातलं होतं. आता प्रभास अभिनीत हा साय-फाय चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. मात्र, ‘कल्की २८९८ एडी’ एकाच वेळी दोन ठिकाणी दिसत असल्याने आता चाहते आणि प्रेक्षक गोंधळात पडले आहेत.

'कल्की २८९८ एडी' आजपासून ओटीटीवर प्रसारित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. आता कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'कल्की २८९८ एडी' कोणत्या वेळी पाहू शकतो, ते जाणून घेऊया...

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

प्रभास स्टारर फिल्म 'कल्की २८९८ एडी' काल मध्यरात्रीपासून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. हा चित्रपट मध्यरात्री म्हणजेच १२ वाजतापासून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर बघता येणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रसारित केला जाईल.

'कल्की २८९८ एडी'चं हिंदी व्हर्जन कुठे पाहता येईल?

'कल्की २८९८ एडी'चे हक्क दोन ओटीटी प्लॅटफॉर्मन्सनी खरेदी केले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ व्यतिरिक्त, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे हक्क विकत घेतले आहेत आणि चित्रपटाची हिंदी आवृत्ती देखील काल मध्य रात्रीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे हिंदीतून हा चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्हाला नेटफ्लिक्स उघडावं लागेल. मात्र, आता घरबसल्या या चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

किती होतं ‘कल्की २८९८ एडी’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन?

हिंदू पौराणिक कथांवर आधारित 'कल्की २८९८ एडी' हा साय-फाय चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण अभिनीत हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच हिट झाला आहे. 'कल्की २८९८ एडी' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६४५.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रभासच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०४.६५ कोटींचा व्यवसाय केला होता. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. तर, प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुमथीची भूमिका साकारली आहे. सुमथीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो.