Kalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड! शाहरुख खानलाही टाकलं मागे
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Kalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Jul 12, 2024 07:44 AM IST

Kalki 2898 AD Collection: साय-फाय चित्रपट 'कल्की २८९८ एडी' २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या मल्टीस्टारर चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Kalki 2898 AD
Kalki 2898 AD

Kalki 2898 AD Collection: ‘बाहुबली’ स्टार प्रभासचा 'कल्की २८९८ एडी' हा २०२४मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, यासोबतच चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कलेक्शन करून इतिहासही रचला आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यातील काही दिवसांमध्ये 'कल्की २८९८ एडी'च्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. तरीही या चित्रपटाने रिलीजच्या १५व्या दिवशी शाहरुख खानच्या ‘पठान’चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

साय-फाय चित्रपट 'कल्की २८९८ एडी' २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या मल्टीस्टारर चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती आणि तेव्हापासून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आत भारतात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शन आलेखात लक्षणीय घट झाली असली, तरी बॉक्स ऑफिसवर तो जोरदार कमाई करत आहे.

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दीपिका पदुकोण दिसणार नाही? नेमकं सत्य काय?

किती केले कलेक्शन?

'कल्की २८९८ एडी'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४१४.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 'कल्की २८९८ एडी'ने १६.७ कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी ३४.१५ कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी ४४.३५ कोटी रुपये, दुसऱ्या सोमवारी १०.०४ कोटी रुपये, दुसऱ्या मंगळवारी ८.८ कोटी रुपये आणि दुसऱ्या बुधवारी ७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. Sacknilkच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'कल्की २८९८ एडी' ने रिलीजच्या १५व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी ६.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'कल्की २८९८ एडी'ने मोडला 'पठान'चा रेकॉर्ड!

'कल्की २८९८ एडी' ने रिलीजच्या १५व्या दिवशी ५४३.४५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह शाहरुख खानच्या 'पठान'च्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. 'पठान' या चित्रपटाचे कलेक्शन ५४३.०५ होते. आता 'कल्की २८९८ एडी'चे पुढचे टार्गेट रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'चे कलेक्शन म्हणजेच ५३६.३६ कोटी पार करणे असणार आहे. या वीकेंडपर्यंत प्रभासचा चित्रपट रणबीर कपूर स्टारर चित्रपटाला मागे टाकतो की, नाही याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 'कल्की २८९८ एडी' हा ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, दिशा पाटनी यांच्यासह अनेक कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Whats_app_banner