बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. अभिनेत्री काजोलच्या 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या नूर मालाबिकने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
अभिनेत्री नूर मालाबिकने ६ जून रोजी मुंबईतील लोखंडवाला येथील राहत्या घरात आत्महत्या केली. ती केवळ ३७ वर्षांची होती. पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून नूरने आत्महत्या का केली? या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
वाचा: शाहरुखचा लेक आर्यन खान ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही, काय आहे कारण?
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घराचा दरवाजा तोडून अभिनेत्रीच्या घरात गेले तेव्हा त्यांना तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट NGOनं अभिनेत्रीवर रविवारी अंत्यसंस्कार केले.
वाचा: आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?
पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. 'आम्ही अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी संवाद साधला. एक आठवड्यापूर्वीच ते मुंबईतून गावी गेले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हे धक्कादायक आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
वाचा: दिग्दर्शकाच्या प्रेमात ते वडिलांवर फसवणूकीचा आरोप; जाणून घ्या अमिषा पटेलविषयी काही खास गोष्टी
अभिनेत्रीचा मित्र आलोकनाथ पाठकला याबाबत कळताच धक्का बसला. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, “मला ही माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला. नूरला मी अनेक वर्षांपासून ओळखत होतो. आम्ही अनेक मालिका आणि सिनेमात एकत्र काम केले होते. तिची फॅमिली मागील आठवड्यात मुंबईत आली होती.” अभिनेत्री अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती असे देखील त्याने सांगितले. आता पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
नूर मालाबिकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने काही मालिका आणि वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले आहे. तिच्या ‘एटीएम भाभी’, ‘आईएम सॉरी टीचर’ आणि ‘अदला बदली’ या वेब सीरिज प्रदर्शित झाल्या होत्या. ती नेहमी तिच्या बोल्डनेससाठी विशेष ओळखली जायची. 'घरवाली बाहरवाली' या सीरिजमधील तिचा बोल्ड सीन विशेष गाजला होता. तसेच काजोलच्या 'द ट्रायल' या सीरिजमधील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.