Kajal Agraval New Video: बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. कलाकारांचा चाहता वर्ग देखील मोठा असतो. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तसेच त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुरत असतात. कधीकधी कलाकार समोर येताच चाहते विचित्र वागतात. असेच काहीसे अभिनेत्री काजल अग्रवालसोबत घडले आहे.
काजल हैदराबद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका इवेंटमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमासाठी काजलने लाल रंगाची वेस्टर्न साडी नेसली होती. केसाचा पोनी घातला होता. यालूकमध्ये काजल अतिशय सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात एक अनोखी व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी काजलच्या अगदी जवळ येते आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. काजलला हे सगळे विचित्र वाटते. तेवढ्यात मॅनेजमेंटची लोक त्या चाहत्याला तेथून हकलतात.
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर काजलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने 'असे का वागतात लोक' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अशा लोकांमुळे चाहत्यांची नावे खराब होतात' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: कुठला चित्रपट जिंकणार ऑस्कर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार पुरस्कार सोहळा
काजलने २०२२मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आहे. तिने चित्रपटाचे चित्रीकरण आधीच करुन ठेवले होते. गेल्या दोन वर्षात तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित झाले. आता ती लवकरच सत्यनामा या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. तसेच तिचा इंडियन २ हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: चला हवा येऊ द्यामधून कुशल बद्रिकेची एग्झिट? अभिनेत्याने सांगितले सत्य
काजलने तिच्या चित्रपटांविषयी वक्तव्य केले होते. 'मी चित्रटांची नेहमीच दिवानी राहिली आहे आणि मी अनेक पॉवरफूल भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच माझे २ मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सत्यभामा आणि इंडियन २ या दोन्ही चित्रपटात माझ्या खूप सुंदर भूमिका आहेत. मी माझ्या भूमिकांबद्दल उत्सुक आहे' असे काजल म्हणाली. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.