मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Kailash Kher: शिस्त शिकून या! ‘खेलो इंडिया’च्या व्यवस्थापनावर भडकले कैलाश खेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 26, 2023 02:15 PM IST

Kailash Kher angry at Khelo India: कैलाश खेर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कमांडोजवर ओरडताना दिसले आहेत.

Kailash Kher
Kailash Kher

Kailash Kher angry at Khelo India: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेर अनेकदा चर्चेत असतात. नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे ते प्रसिद्धी झोतात असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कमांडोजवर ओरडताना दिसले आहेत. ते त्यांना शिस्त शिकून या असे ओरडून सांगताना दिसत आहेत. ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धे’च्या व्यवस्थापनावर ते संतापलेले दिसत आहेत. पण, असं नेमकं काय घडलं असावं, ज्यामुळे कैलाश खेर इतके संतापले आहेत, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन लखनौमध्ये होत आहे. २५ मे ते ३ जून या कालावधीत हा महोत्सव चालणार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून कैलाश खेर आले होते. पण, त्यांच्या कार्यक्रमात काही अडथळे आल्याने कैलाश खेर प्रचंड संतापले आणि त्यांनी तिथल्या व्यवस्थापन समितीची शाळा घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले.

IIFA 2023: सलमान खानच्या बॉडीगार्ड्सनी विक्की कौशलला दिली अशी वागणूक; व्हिडीओ पाहून संतापले चाहते!

या व्हिडीओमध्ये कैलाश खेर रागाने म्हणताना दिसत आहेत की, ‘आम्ही पंतप्रधानांचे नवरत्न आहोत. तुम्ही जरा शिस्त शिका. तासभर थांबायला लावलं. त्यानंतरही इथे काही शिस्त दिसत नाहीये. खेलो इंडिया म्हणजे काय? खेलो इंडिया म्हणजे जेव्हा आपण आनंदी असतो. कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील, तरच बाहेरचे लोक सुखी होतील. काहींना कसे काम करावे हेच माहित नाहीये. आणि आता जर मी बोलायला लागलो, तर तुम्हाला वाटेल मी खूप बोलतोय.’

कैलाश खेर पुढे म्हणाले की, 'जर आम्हाला गाणं म्हणायला बोलावलं असेल, तर सांगा की दीड तास फक्त आमचा आहे. आता लक्ष न दिल्यास हे असेच सुरू राहणार आहे. गरज असेल तिथे आणखी कमांडो गिरी दाखवा. लक्षात ठेवा, आम्ही जगतो भारतासाठी, मरणार फक्त भारतासाठी...' कैलाश खेर सुमारे तासभर जॅममध्ये अडकले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी रोखलं, त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं होतं.

WhatsApp channel

विभाग