Justin Bieber-Hailey Bieber: जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरच्या गाण्यांनी जगाला वेड लावले आहे. त्याच्या गाण्यांसोबतच जस्टिन त्याच्या आलिशान लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतो. याचा पुरावा त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा पाहायला मिळतो. सध्या, गायक लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी हेली बीबर गरोदर आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे, त्यानुसार जस्टिन बीबरची आर्थिक स्थिती सध्या चांगली नसल्याचं बोललं जात आहे आणि याचं कारणामुळे त्याला आपल्या गर्भवती पत्नीला सोडून मुकेश अंबानींच्या कार्यक्रमात गाण्यासाठी भारतात यावं लागलं आहे. हा खळबळजनक दावा गायकाशी संबंधित काही लोकांनी केला आहे. जस्टिन बीबरच्या गरिबीचे कारण दुसरी कोणी नसून, त्याची पत्नी हेली असल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच आजकाल गायक खूप तणावाखाली असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जस्टिन बीबरने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी १० मिलियन रुपये आकारले होते. याशिवाय, असे म्हटले जाते की जस्टिनची एकूण संपत्ती २०० ते ३०० दशलक्ष आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, इतका पैसा असताना देखील जस्टिनला त्याची गर्भवती पत्नी हेली बीबरला घरी सोडून अंबानींच्या कार्यक्रमात गाण्यासाठी भारतात येण्याची काय गरज होती? त्याला एवढ्या पैशांची गरज का होती?
अनेक रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, जस्टिन बीबर सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याच्या जवळच्या सूत्रांचा दावा आहे की, गायकाची पत्नी पैशांची अतिशय उधळपट्टी करत आहे. केवळ खासगी विमानाने उड्डाण करण्यासाठी तिने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. एक दावा असाही आहे की, हेली बीबरने एकदा मॅनिक्युअर घेण्यासाठी प्रायव्हेट जेटने प्रवास केला होता. असे म्हटले जात आहे की, या खर्चामुळे जस्टिन ना करोडपती राहिला आहे, ना पूर्वीसारखे म्युझिक बनवण्यात तज्ज्ञ आहे. या सगळ्यामागचे कारण त्याची पत्नी हेली बीबर असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांनी असाही दावा केला आहे की, हेली बीबरने जस्टिनवर पूर्ण ताबा मिळवला आहे, ज्यामुळे जस्टिन त्याच्या कुटुंब आणि मित्रांपासून दूर गेला आहे. २०२१पासून त्याने कोणताही नवीन अल्बम लाँच केलेला नाही. तसेच, तो कोणत्याही मैफलीचा भाग बनला नाही. गेल्या वर्षी त्याने त्याच्या चेहऱ्याच्या आजाराबद्दल सांगितले होते. आता जस्टिन थेट अनंत अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करायला पोहोचला होता. २०२३मध्ये त्याला मोठा धक्का बसला होता. जस्टिनला त्याच्या मागील गाण्यांच्या कॅटलॉगचे हक्क विकावे लागले होते. रिपोर्ट्सनुसार, हेली बीबरने तिच्या गरोदरपणात अंदाजे दीड दशलक्ष डॉलर किंमतीची अंगठी खरेदी केली होती, ज्याच्या विरोधात जस्टिन होता. पण, हेलीने त्याचे काहीही ऐकले नाही. आता यात किती तथ्य आहे, याबद्दल दोघेही मौन बाळगून आहेत.