Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

Nov 29, 2024 05:37 PM IST

Justin Bieber is Facing Financial Crisis: जस्टिन सध्या रॅमसे हंट सिंड्रोम या आजाराशी झुंज देत आहे. परंतु, त्याच दरम्यान त्याची बँक खाती आता रिकामी होत चालली आहेत.

Justin Bieber is Facing Financial Crisis
Justin Bieber is Facing Financial Crisis

Justin Bieber is Facing Financial Crisis : पॉप सुपरस्टार जस्टिन बीबर सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता त्यांच्या तब्येतीच्या समस्यांमुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळले आहे. जस्टिन सध्या रॅमसे हंट सिंड्रोम या आजाराशी झुंज देत आहे. परंतु, त्याच दरम्यान त्याची बँक खाती आता रिकामी होत चालली आहेत. जस्टिनने बऱ्याच काळापासून काही नवे काम हाती घेतलेले नाही. दुसरीकडे, आलिशान जीवनशैली जगात असल्यामुळे आता  पॉप गायकाला आर्थिक चणचण भासू लागली आहे.

येणाऱ्या आर्थिक संकटाचा विचार करून आता जस्टिन बीबर आता त्याचे संगीत आणि म्युझिक शो पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे तो त्यांची आर्थिक आवक पुन्हा एकदा सुरू होऊ शकेल. यासोबतच जस्टिनने ज्या व्यवस्थापकांवर त्याच्या मालमत्तेच्या गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला आहे.

जस्टिनला कोणता आजार झालाय?

जस्टिन बीबरला झालेला रॅमसे हंट सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्यामुळे चेहऱ्याचा पक्षाघात आणि श्रवणशक्ती कमी होते. जस्टिन बीबरला या आजाराने ग्रासले होते आणि यामुळे त्याने २०२३मध्ये त्याचे 'जस्टिन्स वर्ल्ड टूर'चे बहुतेक शो रद्द केले होते. मात्र, आता त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाल्याने तो पुन्हा म्युझिक दौरे सुरू करण्याचा विचार करत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, एका सूत्रानुसार, 'जस्टिनला आता कमाईसाठी म्युझिकल टूर करण्याची गरज भासू शकते. परंतु, त्याच्या या आजारपणामुळे टूरिंग शो करणे खूप कठीण होऊ शकते.'

जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला पॅरालिसीस, व्हिडीओ शेअर करत स्वत:च सांगितलं

जस्टिन बीबरची जीवनशैली, आरोग्याच्या समस्या आणि काम करू न शकल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. २०२१पासून त्याने फारशी नवीन गाणी केलेली नाहीत, त्यामुळे त्याचा चाहत्यांशी संपर्कही कमी झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जस्टीन त्याच्या बँक बॅलन्सची काळजी न करता दोन्ही हातांनी खर्च करत असतो, जे त्याच्या या स्थितीसाठी अंशतः जबाबदार आहे.

जस्टिन बीबरवर कर्जाचा डोंगर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जस्टिनने २०२२मध्ये त्याचा म्युझिक कॅटलॉग ‘हिपग्नोसिस सॉन्ग्स फंड’ला २०० दशलक्ष डॉलर्सला विकला होता. तरीही त्याच्यावर ३८०, ३४९ कोटीं आणि १६.६ दशलक्ष कॅलिफोर्नियातील घरावर थकबाकी आहे. या आर्थिक संकटाच्या काळात जस्टिन बीबर आता त्याच्या माजी व्यवस्थापकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. जस्टिनने आरोप केला आहे की, त्याच्या माजी व्यवस्थापकांनी त्याच्या ३०० दशलक्ष डॉलर्स संपत्तीचा गैरवापर केला आहे.

Whats_app_banner