Justin Bieber In Mumbai: प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर त्याच्या संगीत आणि आवाजामुळे जगभरात लोकप्रिय आहे. जगातील सर्वात यशस्वी गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो. या कॅनेडियन पॉप गायक आणि गीतकाराने वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी जगभरात जे स्थान मिळवले आहे, ते स्थान गाठणे प्रत्येकासाठी सोपे नाही. जस्टिन बीबरच्या 'बेबी' गाण्याने भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड वाढवला. अगदी ज्यांना इंग्रजी येत नाही अशा लोकांच्याही ओठावर हे गाणं होतं. अगदी कमी वयात आपलं नाव गाजवणारा जस्टिन बीबर नुकताच मुंबईत आला आहे. जस्टिन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात गाणी गाणार आहे. यासाठीच तो भारतात आला आहे.
जस्टिन बीबर हा प्रसिद्ध गायक असण्यासोबत तो अतिशय श्रीमंत देखील आहे. २०० कोटींच्या बंगल्यात आलिशान राहणाऱ्या जस्टिन बीबरकडे एक नाही, दोन नाही तर अनेक आलिशान बंगले आहेत. त्याचे कार कलेक्शन आणि त्याच्या घड्याळांचे कलेक्शन पाहून सगळ्यांचेच डोळे पांढरे होतात. कॅलिफोर्नियाच्या बेव्हरली हिल्समध्ये असलेल्या जस्टिनच्या राहत असलेल्या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे. हेली बीबरशी लग्न झाल्यानंतर १८ महिन्यांनी त्याने हा बंगला विकत घेतला होता. २.५ एकरमध्ये बांधलेल्या या बंगल्यात ७ बेडरूम, १० बाथरूम, जिम, थिएटर आणि अनेक लक्झरी गोष्टी आहेत. या घराबाहेर एक मोठा स्विमिंग पूल आणि टेनिस कोर्टही बांधलेले आहे.
याशिवाय जस्टिन बीबरचा हॉलिवूड, लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान बंगला आहे, ज्यासाठी तो दरमहा २४ लाख रुपये भाडे देतो. या बंगल्यात नाईट क्लब, बार, चित्रपटगृह बांधले आहे. येथे जस्टिन पार्ट्या आयोजित करतो. या बंगल्यात पाहुण्यांना राहण्यासाठी १० खोल्या देखील आहेत. त्याचं कॅनडामध्येही घर आहे. याशिवाय त्याला महागड्या घड्याळांची आणि गाड्यांचीही आवड आहे. त्याच्याकडे असलेल्या घड्याळांमध्ये हिरे आणि सोन्याचे काम केलेले आहे. तो अतिशय महागड्या गायकांमध्ये सामील आहे.
जस्टिन बीबर आता भारतात आला असून, तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात गाणार आहे. या परफॉर्मन्ससाथ जस्टिनने तब्बल ८३ रुपये मानधन आकारले आहे. २०१७मध्ये जस्टिन बीबरने भारतात म्युझिक शो केला होता. यामध्ये त्याच्यावर लीपसिंक केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे तो वादात अडकला होता. मात्र, आता त्याला अंबानी कुटुंबाकडून लग्नाचे निमंत्रण मिळाले असून, तो या कार्यक्रमात आपला जलवा दाखवणार आहे.
संबंधित बातम्या