Justin And Hailey Bieber welcomes Baby: प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी हेली बीबरने एका मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. जस्टिनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपल्या नवजात मुलाची झलक दाखवली आहे. यासोबतच त्यांनी मुलाचे नावही जाहीर केले आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. जस्टिन बीबर गेल्या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आला होता आणि त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभात शानदार परफॉर्मन्स दिला होता. मात्र, प्रेग्नंट पत्नीला एकटी सोडून भारतात आल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.
गायक जस्टिन बीबरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. फोटो शेअर करताना गायकाने त्याला कॅप्शन दिले, 'वेलकम होम जॅक ब्लूज बीबर.' जस्टिन आणि हेली बीबर यांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहे, ज्याचा त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. याशिवाय दोघांनीही पोस्टमध्ये बाळाच्या लहान पायांची झलक दाखवली आहे.
जस्टिन बीबरने त्याची पोस्ट शेअर करताच त्याच्या चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, एका युजरने लिहिले की, 'तुमचे खूप अभिनंदन.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'स्वागत आहे लिटल जॅक ब्लूज बीबर.' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्या चिमुकल्याच्या आगमनाबद्दल खूप उत्सुक आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'मी तुला बघण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.' अशा प्रकारे युजर्स जस्टिन बीबरचे त्याच्या पोस्टवर अभिनंदन करत आहेत.
जस्टिन बीबर आणि हेली बीबर लहानपणापासूनच एकमेकांचे खास मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१८ साली दोघांनी साऊथ कॅरोलिनामध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर हेली आणि जस्टिन यांनी यावर्षी मे महिन्यात गर्भधारणेची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते त्यांच्या मुलाचे स्वागत करण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते. आता या जोडप्याला मुलगा झाला असल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.