जून २०२४मध्ये, 'कोटा फॅक्टरी ३', ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन २’, ‘गुल्लक ४’, ‘बिग बॉस ओटीटी ३’ आणि ‘ब्रिजर्टन ३ भाग २’ सह अनेक वेब सीरिज अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. 'द बॉईज ४', 'गुनाह', 'द लीजेंड ऑफ हनुमान ४' यांसारख्या सीरिजची तर चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
जिओसिनेमावर स्ट्रिमिंग होणारा हा वेब शो जूनमध्ये लाँच होणार आहे. नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही. जिओ सिनेमाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका मिनिटाच्या प्रोमोद्वारे ही घोषणा करण्यात आली. बिग बॉस ओटीटी या लोकप्रिय बिग बॉस फ्रँचायझीचा स्पिन-ऑफ सर्वप्रथम करण जोहरने होस्ट केला होता. त्यानंतर अभिनेता सलमान खानने दुसरा सीझन होस्ट केला होता.
टीन ड्रामा शो कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझन २० जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. ही सीरिज शहरातील विद्यार्थ्यांचे जीवन आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) उत्तीर्ण करून भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर आधारित आहे. अधिकृत कथानकानुसार, नवीन सीझनमध्ये विद्यार्थी प्रौढत्वाकडे वळतील, अंतिम परीक्षा जवळ येताच भीती आणि आकांक्षांशी झुंजताना दिसतील आणि भविष्यात काय होईल याचा विचार करतील. प्रतिश मेहता दिग्दर्शित कोटा फॅक्टरीमध्ये जितेंद्र कुमार, मयूर मोरे, अहसास चन्ना आणि रंजन राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवीन सीझनमध्ये तिलोत्तमा शोम देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’ या काल्पनिक सीरिजचा स्पिन-ऑफ असलेला हा शो इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत उपलब्ध असेल. १७ जून रोजी जिओसिनेमा प्रीमियमवर भारतात स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. अमेरिकेसह इतर देशातही हे एपिसोड्स दर सोमवारी प्रदर्शित होतील. दुसऱ्या सीझनमध्ये मॅट स्मिथ, ऑलिव्हिया कुक, एम्मा डिआर्सी, इव्ह बेस्ट, स्टीव्ह टॉसेंट, फॅबियन फ्रँकेल, इवान मिशेल, टॉम ग्लिन-कार्नी, सोनोया मिझुनो आणि रायस इफान्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुनरागमन करणाऱ्या कलाकारांमध्ये हॅरी कोलेट, बेथनी अँटोनिया, फोबी कॅम्पबेल, फिया साबान, जेफरसन हॉल आणि मॅथ्यू नीडहॅम यांचा समावेश आहे. अबूबकर सलीम, गेल रँकीन, फ्रेडी फॉक्स, सायमन रसेल बील, क्लिंटन लिबर्टी, जेमी केना, कायरन बेव, टॉम बेनेट, टॉम टेलर आणि व्हिन्सेंट रेगन हे आगामी सीझामधील नवे चेहरेआहेत.
या फॅमिली एंटरटेनर वेब सीरिजमध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मयार, सुनीता राजवार आणि नवोदित अभिनेत्री हेली शाह मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयांश पांडे दिग्दर्शित टीव्हीएफचा 'गुल्लक ४' हा शो ७ जूनपासून सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.
सुरभी ज्योती आणि गश्मीर महाजनी नव्या ड्रामा सीरिजमध्ये झळकणार आहेत. अनिल सीनियर दिग्दर्शित 'गुनाह' हा चित्रपट ३ जून रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
ब्रिजर्टन सीझन ३मध्ये पेनेलोपी आणि कॉलिन चर्चेत आहेत आणि आपल्या आकर्षक कथानकाने प्रेक्षकांना भुरळ घालतात. हा सीझन मैत्री, प्रेम आणि आपल्या नशिबाला आकार देणाऱ्या कथानकाच्या गुंतागुंतीचा शोध घेतो. या मालिकेत जोनाथन बेली लॉर्ड अँथनी ब्रिजर्टनच्या भूमिकेत, सिमोन अॅश्ले केट शर्माच्या भूमिकेत आणि क्लॉडिया जेसी एलोइस ब्रिजर्टनच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेचा पहिला भाग १३ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि भाग २ येत्या १३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
या ड्रामा सीरिजमध्ये कार्ल अर्बन, जॅक कायड, अँटनी स्टार आणि एरिन मोरियार्टी यांच्या भूमिका आहेत. 'बॉईज'च्या नव्या सीझननुसार, व्हिक्टोरिया न्यूमन ओव्हल ऑफिसच्या पूर्वीपेक्षा अधिक जवळ आली आहे आणि होमलँडरच्या दबावाखाली आहे, जो आपली शक्ती मजबूत करत आहे. जगण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असलेल्या बेकाचा मुलगा आणि बुचरने बॉईज लीडरची नोकरी गमावली आहे. उर्वरित टीम त्याच्या खोटारडेपणाला कंटाळलीआहे. धोका पूर्वीपेक्षा जास्त असल्याने त्यांना खूप उशीर होण्यापूर्वी एकत्र काम करण्याचा आणि जग वाचवण्याचा मार्ग शोधावा लागनार आहे. १३ जूनरोजी प्राइम व्हिडिओजवर याचा प्रीमियर होणार आहे.
या सीरिजचा चौथा सीझन ५ जून रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. नव्या सीझनमध्ये कुंभकर्ण आपली राक्षसी शक्ती, इंद्रजीतच्या घातक योजना आणि अहिरावणच्या काळ्या योजना दाखवणार आहे. तर, हनुमान आपल्या शक्तिशाली वानर सेनेला युद्धासाठी सक्षम बनवणार आहे. ग्राफिक इंडिया, शरद देवराजन, जीवन जे कांग निर्मित या मालिकेत रावणाच्या भूमिकेत शरद केळकर आणि हनुमानाच्या भूमिकेत दमन सिंह यांचा आवाज आहे.
अॅमेझॉन एमजीएमने नुकताच सेलिन डिऑनच्या डॉक्युमेंटरीचा पहिला ट्रेलर रिलीज केला. आयकॉनिक सिंगरच्या आयुष्याची झलक दाखवणारी ही डॉक्युमेंटरी तिच्या स्टिफ पर्सन सिंड्रोमसोबतच्या लढाईवर प्रकाश टाकणारी आहे. ‘आय एम : सेलिन डायन’ च प्रीमियर २५ जून रोजी प्राइम व्हिडीओवर होणार आहे.
जेक गिलेनहाल, रूथ नेगा, बिल कॅम्प, एलिझाबेथ मार्व्हल, पीटर सरसगार्ड, ओ-टी फागबेन्ले आणि रेनेट रेन्सवे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही नवीन आठ भागांची मर्यादित सीरिज आहे. यात जेक मुख्य उपअभियोजक रस्टी सबिचच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बुधवार, १२ जून रोजी पहिल्या दोन भागांसह अॅपल टीव्ही + वर ‘प्रीझ्युम इनोसेंट’ रिलीज होणार आहे आणि त्यानंतर दर बुधवारी २४ जुलैपर्यंत एक नवीन एपिसोड प्रसारित होईल.