मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आमिर खानचा लेक जुनैदचा 'महाराज' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती

आमिर खानचा लेक जुनैदचा 'महाराज' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 14, 2024 09:11 AM IST

आमिर खानचा मुलगा जुनैद 'महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

Maharaj: 'महाराज' चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती
Maharaj: 'महाराज' चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती

सध्या अनेक स्टारकिड्स हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लेक जुनैदचा देखील समावेश आहे. तो 'महाराज' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. पण जुनैदच्या या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच स्थगिती आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला ग्रहण लागल्याचे म्हटले जात आहे.

'महाराज' हा चित्रपट १४ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. अहमदाबाद आणि मुंबईत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहमदाबादमध्ये वैष्णव पंथाच्या अनुयांनीदेखील याचिका दाखल केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यात आली आहे. १८ जून पर्यंत चित्रपटाला स्थगिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाने यशराज फिल्मस, ब्रॉडकास्टिंग प्राधिकरण, सेन्सॉर बोर्ड, नेटफ्लिक्सला या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा

जुनैद खानचा 'महाराज' हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता होती. पण आता कोर्टाने स्थगिती आणल्यामुळे चित्रपट १८ जून पर्यंत प्रदर्शित होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. अद्याप या प्रकरणी यशराज फिल्मसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे 'महाराज' चित्रपटाची कथा?

'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट १८६२ सालच्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. एकंदरीत चित्रपटाची कथा रंजक असणार असे प्रेक्षकांना वाटत होते. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्यात आली आहे.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये काय होणार

WhatsApp channel
विभाग