बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले चांगलाच धमाकेदार होता. करण वीर मेहरा या शोचा विजेता ठरला. त्याचबरोबर अनेक स्टार्सनी आपल्या उपस्थितीने फिनालेला चार चाँद लावले. यावेळी बिग बॉसच्या इतिहासात असं काही घडलं जे याआधी कधीच घडलं नव्हतं. बिग बॉसच्या प्रवासात बॉलिवूड अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच फिनालेला हजेरी लावली. या शोमध्ये आमिर खानने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. तसेच त्याचा मुलगा जुनैद खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली.
आमिर खान आपला मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूरच्या लव्हयापा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. यावेळी प्रेक्षकांना पुन्हा एकदा 'अंदाज अपना अपना' म्हणजेच सलमान आणि आमिरची जोडी एकत्र पाहण्याची संधी मिळाली. अशातच खूप मस्ती दरम्यान आमिरच्या मुलाने आपल्या दोन एक्स वाइफबद्दल असं काही सांगितलं, जे आता चर्चेत आहे.
खरं तर 'लव्हयापा' चित्रपटात जुनैद खान आणि खुशी कपूरच्या फोनची आदलाबदली होते. त्यामुळे जुनैदने बिग बॉसमध्ये तोच सीन रिक्रिएट केला, पण त्यात ट्विस्ट असा होता की ही फोनची देवाणघेवाण इतर कुणासोबत नाही तर आमिर खान आणि सलमान खानसोबत झाली होती. आमिर आपला फोन बदलायला तयार होता, पण सलमान मात्र विचारात पडतो. आधी आमिरने सलमानचा फोन पाहून मस्करी केली. फोन उघडून आमिर म्हणाला, 'या वालीचा नंबर अजून सेव्ह आहे. सकाळीच फोन आला होता.'
त्यानंतर सलमान आमिरचा फोन घेतला आणि सुरु केला. सलमान म्हणाला, "तू नवीन गर्लफ्रेंड बनवली आहेस का? ओह, तुझ्या फोनवर मला काय मिळेल? यावर आमिरचा मुलगा गंमतीने म्हणतो, 'दोन एक्स वाईफचे अत्याचार तुम्ही वाचू शकाल.' यावेळी जुनैदने किरण राव आणि रीना दत्ता यांच्याबद्दल बोलत असतो. आमिरने आधीच्या दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला आहे.
वाचा: रिया चक्रवर्तीने वाचवले एका महिलेचा जीव, तुरूंगातून बाहेर येताच तिने मानले आभार
करण वीर मेहराने बिग बॉस 18 च्या विजेत्याची ट्रॉफी जिंकली. पण या घरातील इतर स्पर्धकांनी देखील चांगलीच टक्कर दिली. बिग बॉसच्या घरात रजत दलाल, विवियन डिसेना, ईशा सिंग, करण वीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, तेजिंदर पाल सिंग बग्गा, वाइल्ड कार्ड स्पर्धक अदिती मिस्त्री, एलिस कौशिक, एडिन रोज, आरफिन खान, शहजादा धामी, मुस्कान बामणे, विरल भाभी म्हणजेच हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते आणि नायरा बॅनर्जी यांनी एन्ट्री घेतली.
संबंधित बातम्या