छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायली हे महत्त्वाचे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून जुईने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. जुई या मालिकेविषयी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देताना दिसत असते. नुकताच जुईने केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने मालिकेतील सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्याचे सांगितले आहे.
जुई गडकरी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या खासगी आयुष्याविषयी तसेच मालिकेच्या सेटवरील गमती जमती चाहत्यांशी शेअर करताना दिसते. नुकताच जुईने सोशल मीडियावर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. तसेच पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घ्या असे आवाहान देखील तिने केले आहे.
वाचा : गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून
अगदी काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना… मला वर्षानुवर्षे त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा… पण निदान त्यामुळे ट्राफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा… घरी उशिरा जात असाल पण, सुखरुप पोहोचत होता!
वाचा : बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही… पण तुमची वाट बघणारे आहेत… काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा… पावसाळा येतोय… पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात… तर स्वत:ची आणि इतरांची पण काळजी घ्या
तुमचाच (लाडका) रस्ता!
गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्नं झालंय… त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे… तो गेले ७-८ दिवस कोमात आहे… प्लीज गाड्या हळू चालवा.
वाचा : 'भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती', रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा
पावसाळा आला की रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचते, खड्डे पडतात. पण रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे अपघात देखील होतात. त्यामुळे पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घ्या असे जुई गडकरी पोस्टमध्ये म्हणाली आहे.
संबंधित बातम्या