बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा चित्रपटातील त्याच्या अॅक्शन सीन्समुळे कायमच चर्चेत राहिला आहेत. त्याच्या खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्याविषयी सर्वजण जाणून घेण्यास उत्सुक असतात. आत जॉनने मुंबईत आलिशान बंगला खरेदी केला आहे. खार येथील लिंकिंग रोड भागात जॉनने हे नवे घर आहे.
जॉनच्या बंगल्याचे नाव निर्मल भवन असे आहे. तसेच हा बंगला ७७२२ क्वेअर फीटमध्ये आहे. जॉनने हा बंगला प्रवीण नाथलाल शाह यांच्याकडून खरेदी केला आहे. समुद्र किनाऱ्याजवळील या बंगल्याच्या खरेदी साठी जॉनने ४.२४ कोटी रुपये टॅम्प ड्यूटी भरली आहे. या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन २७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या बंगल्याची किंमत जवळपास ७५.०७ कोटी रुपये आहे.
वाचा: मलायका अरोरा – अर्जुन कपूरच्या नात्यात दुरावा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
यापूर्वी जॉनने २००९ साली एक घर खरेदी केले होते. यूनियन पार्कच्या शेजारी असलेल्या शाळेच्या बाजूला एका पारसी कुटुंबाकडून त्याने हे घर खरेदी केले होते. त्यानंतर आता पुन्हा जॉनने नवे घर खरेदी केले आहे.
खार परिसरात अनेक बॉलिवूड कलाकार आणि उद्योगपतींचे बंगले आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना तेथे राहण्याची इच्छा असते. या भागात पर क्वेअरफिट १ ते दीड लाख रुपये जागेचा भाव आहे. शुक्रवारी अभिनेता आमिर खानच्या वांद्रे येथील सोसायटीची रीडिवलेपमेंट डिल देखील झाली आहे.