जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?

जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Aug 07, 2024 10:52 PM IST

जॉन अब्राहमने नुकतीच ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरची भेट घेतली. तिच्या भेटीचा फोटो जॉनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे जॉन ट्रोल झाला आहे.

जॉन अब्राहम आणि मनू भाकर
जॉन अब्राहम आणि मनू भाकर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्राँझपदके जिंकणारी भारतीय नेमबाज मनू भाकर बुधवारी मायदेशी परतली. दिल्लीत मनूचे जंगी स्वागत करण्यात आले. तिची अनेकांनी भेट घेतली आणि कौतुक केले. दरम्यान बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील मनू भाकरची भेट घेण्यासाठी गेला होता. त्याने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केला. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे जॉनचा फोटो

जॉन अब्राहमने जेव्हा मनूची भेट घेतली तेव्हा तिने जिंकलेले एक ब्राँझपदक त्याने हातात पकडले. हा फोटो जॉनने सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने, 'मनू भाकर आणि तिच्या कुटुंबाला भेटून खूप आनंद झाला. त्यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. खरच त्यांच्या आभिमान वाटतो' असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर जॉन आणि मनूचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

यूजरने व्यक्त केला संताप

एका युजरने जॉनच्या या फोटोवर कमेंट करत, 'तुम्ही पदकाला हात लावायला नको होता' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, 'सॉरी, पण तुम्हाला दुसऱ्याच्या पदकाला हात लावण्याचा अधिकार नाही' अशी कमेंट केली आहे. जॉन अब्राहमच्या फोटोवर एका युजरने कमेंट केली की, "ठीक आहे, तू मनूचं पदक पकडू नकोस. दोन्ही पदके पकडण्यासाठी तिच्याकडे दोन हात आहेत. तुम्ही नुकतेच फॅनसारखे फोटो काढायला हवे होते." एका यूजरने तर थेट मनूला देखील सुनावले आहे. 'मनू, असं कुणालाही पदक देऊ नका. ही तुमची मेहनत आहे' अशी कमेंट केली आहे.
वाचा: 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सरबजोत सिंगसोबत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात ब्राँझपदक जिंकून इतिहास रचला आहे. आता माझे लक्ष पुढील ऑलिंपिकवर आहे आणि प्रवास सुरू झाला आहे. पॅरिसपाठोपाठ आता लॉस एंजेलिस ऑलिंपिकचा प्रवास सुरू झाला असून मीही थोडी विश्रांती घेऊन त्याची तयारी सुरू करणार आहे असे मनू म्हणाली. मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली महिला नेमबाज आहे. ती तिसऱ्या पदकाच्या ही जवळ आली, पण ब्राँझपदक जिंकून ती चौथ्या स्थानावर राहिली.

Whats_app_banner