Jijau maasaheb birth anniversary : ‘शिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं' हे परभणीच्या कलाकारांनी गायलेलं आणि सादर केलेलं गाणंनववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं. स्वराज्यमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं आज लॉन्च करण्यात आलं. १२ जानेवारी रोजी जिजाऊंची जयंती आहे. हे गाणं मनात चैतन्य जागवणारं व सर्वांना प्रेरणा देणारं आहे.परभणीतील गायकांनी जिजाऊंच्या शौर्याची गाथा गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही पराक्रमी छत्रपतींचा भक्कम आधार म्हणजे जिजाऊ माँसाहेब. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि संस्कारामुळे शिवबांनी स्वराज्याची स्थापना झाली.शिवाजी महाराजांच्या गनिमांविरुद्ध लढाया, युद्धनिती,शिक्षण हे राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा आणि संकल्पना माँ जिजाऊ यांच्याकडूनच घेतली. १२ जानेवारीला त्यांची जयंती साजरी केली जाते. आजच्या आधुनिक युगातील सासूरवाशीण मुलींनाही 'जिजाऊंचं माहेर 'असलेले सिंदखेड हे आपलंही माहेरच वाटतं. हीच अंतरीची भावना या सुंदर गीतातून व्यक्त करण्यात आली आहे.
‘जिजाऊंच्या वाटेनं जाऊ’ या गाण्यात चार महिला कलाकार एकत्र येत जिजाऊंच्या शौर्याची गाथा गात असताना दिसत आहे. माहेरच्या वाटेवरुन जाताना त्यांना शिंदखेडच्या वाटेची आठवण होते, अशी भावना महिला या गाण्यातून व्यक्त करत आहेत. जिजाऊं प्रती असलेली आपली भावना व आपुलकी कलाकारांनी या गीतातून व्यक्त केली आहे. यावर्षीच्या जयंतीला हे गाणं रसिकांसाठी तसेच शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
राजमाता जिजाऊंचं कार्य महाराष्ट्रातील लोकांमध्ये स्फुर्ती जागवणारं आहे. जिजाऊंवर अनेक इतिहासकार, कादंबरीकारांना लिखाण केलं आहे. कवी आणि गीतकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेरित होऊन गीते लिहिली आहे. प्रा. डॉ. कल्याण कदम हे ‘जिजाऊंचं गाणं’ या गाण्याचे गीतकार असून त्यांनीच हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
गायिका संगीता मुळे यांनी आपल्या मधूर आवाजात हे गीत गायलं आहे. यामध्ये वैष्णवी अंभोरे,योगिता राऊत, अनुजा मुकडे आणि किरण मुळे या कलाकारांनी काम केलं आहे. याचं कलादिग्दर्शन बाबा डांगे यांनी केलंय. नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथील प्राचार्य डॉ. विजय कानवटे यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या या गीताची निर्मिती खोपा क्रिएशनच्या आशा कल्याण कदम यांनी केली आहे.
संबंधित बातम्या