Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच आलियाच्या 'जिगरा'चा टीझर-ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात आलियासोबत 'द आर्चीज' चित्रपटातील अभिनेता वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची माफी मागावी लागली आहे. आता नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे माफी मागावी लागली हे जाणून घेण्यासाठी नेटकरी आतुर आहेत.
'जिगरा' चित्रपटात काही कारणास्तव वेदांग तुरुंगात जातो आणि त्याला वाचवण्यासाठी आलिया आपला जीव पणाला लावते असे दाखवण्यात आले आहे. 'जिगरा'चे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. वासनच्या 'जिगरा'चा टीझर पाहून चाहते आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, वासन बाला यांनी आता आपल्या एका पोस्टसाठी श्रद्धा कपूरची माफी मागितली आहे. जाणून घेऊया काय झालं?
'जिगरा' चित्रपटाचा टीझर हा रविवारी ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून 'स्त्री २' चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूरने कौतुक केले. श्रद्धा 'जिगरा' चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला. हा टीझर शेअर करत तिने आलिया भट्टची प्रशंसा केली. 'हा चित्रपट मला भावासोबत चित्रपटगृहामध्ये पाहायचा आहे' असे म्हटले. पुढे श्रद्धाने आलियाचे कौतुक करत, 'आलिया भट्ट किती कमाल आहे.. वसन बाला उत्कृष्ट ट्रेलर आहे' असे म्हटले. श्रद्धाची ही पोस्ट पाहाताच वासन बाला हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. नेटकऱ्यांनी श्रद्धाला आठवण करुन दिली की, वासनने जेव्हा 'स्त्री २'साठी पोस्ट शेअर केली होती, तेव्हा त्याने त्या पोस्टमध्ये तिला टॅग केले नव्हते. पण असे असूनही श्रद्धाने 'जिगरा'चे कौतुक केले.
श्रद्धा कपूरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच वासन बाला यांनी ती पुन्हा पोस्ट केली. यासोबतच त्याने सोशल मीडियावर श्रद्धा कपूरची माफीही मागितली होती. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीला श्रद्धाची पोस्ट शेअर करत, 'खूप खूप धन्यवाद श्रद्धा. आशा आहे की तुम्हाला आणि सिद्धांतला हा चित्रपट आवडेल आणि याचा काहीही संबंध नाही पण मी ही संधी साधून तुझी माफी मागतो. भूल चूक माफ' असे कॅप्शन दिले.
वाचा: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ
श्रद्धाच्या या पोस्टनंतर आलिया भट्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर श्रद्धाने कौतुक केलेली पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, "हा हा हा थँक्यू माय ब्लॉकबस्टर वुमन. 'जिगरा' ११ ऑक्टोबर २०१४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे." आता सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण या चित्रपटात आलिया आणि वेदांत दिसणार आहे.