पहिल्यावहिल्या चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जिया खान. पण करिअर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने स्वत:चे आयुष्य संपवून टाकले. जियाने उचलेल्या पावलानंतर सर्वांनाच धक्का बसला. वयच्या अवघ्या २५व्या वर्षी जियाने आत्महत्या केली. आज २० फेब्रुवारी रोजी जियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
जिया खानची बॉलिवूड कारकीर्द तशी फारच लहान होती. तिने अगदी मोजकेच चित्रपट केले. परंतु, या चित्रपटांमध्ये ती बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दिसली. जिया खान मोठी स्वप्ने उराशी बाळगून सातासमुद्रापारहून मुंबईत आली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'निशब्द' हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला होता. जिया खानने अमिताभ बच्चन यांच्यानंतर आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या अभिनेत्यांसोबतही काम केले होते.
जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तिचे वडील अली रिझवी खान हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक होते, तर आई राबिया अमीन याही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होत्या. आईकडूनच जिया खानला अभिनयाचा वारसा मिळाला होता. जियाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये अभिनय आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला होता.
वाचा: वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक, भाषण करताना अश्रू अनावर
बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जियाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान तिला राम गोपाल वर्माच्या ‘निशब्द’मध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'निशब्द' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हा या चित्रपटाचे नाव सर्वांच्याच ओठावर होते. या चित्रपटाने जियाला प्रसिद्धी बरोबरच अनेक गोष्टी मिळवून दिल्या. तिच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली झाली होती. यानंतर जिया खान, आमिर खानसोबत 'गजनी' या चित्रपटामध्ये झळकली. तर, २०१०मध्ये प्रदर्शित झालेला 'हाऊसफुल' हा जियाचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती.
मात्र, या दरम्यान जियाच्या आयुष्यात अनेक वादळे आली. प्रेमात धोका मिळाल्याने जिया कोलमडून गेली होती. जिया अभिनेता आदित्य पांचोलीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण त्याने फसवल्यामुळे तिने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
संबंधित बातम्या