मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  या दिवशी होणार सुपरहिट ‘झिम्मा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
झिम्मा
झिम्मा (HT)
23 June 2022, 11:46 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 11:46 IST
  • प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार सुपरहिट सिनेमा

‘पावनखिंड’ सिनेमाच्या दमदार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरनंतर प्रवाह पिक्चर भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक सुपरहिट सिनेमा ‘झिम्मा’. संसाराच्या रहाटगाड्यातून बायकांना स्वत:साठी असे खूप कमी क्षण मिळतात. घरच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:साठी जगायचच राहून जातं. मात्र अश्यात एखादी छानशी ट्रीप प्लॅन होते आणि आयुष्यच बदलून जातं. अश्याच एका भन्नाट ट्रीपमध्ये आयुष्य नव्याने गवसलेल्या सात स्त्रियांची गोष्ट झिम्मा सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘झिम्मा’ या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे यातली भन्नाट पात्र. प्रत्येकालाच आपली आई, आपली मुलगी, आपली पत्नी, आपली आजी आणि आपली मैत्रीण भेटल्याचा आभास नक्कीच होईल. सिनेमातल्या पात्रांसोबत घरबसल्या प्रेक्षकांनाही एका छान सहलीचा आनंद लुटता येईल.
आणखी वाचा : क्रांती रेडकरचा नवा चित्रपट, लंडनमध्ये शुटिंगला सुरुवात

सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींनी या सिनेमात आपल्या जबरदस्त अभिनयाने सप्तरंग भरले आहेत. तर सिद्धार्थ चांदेकरचा हजरजबाबीपणा सिनेमात वेगळीच रंगत आणतो. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

आयुष्य भरभरुन जगायला शिकवणाऱ्या झिम्मा सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिनज प्रीमियरयेत्या रविवारी म्हणजेच २६ जूनला दुपारी १ वाजता टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग