Jhimma 2: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, सिनेमागृहात अर्धकत पूर्ण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, सिनेमागृहात अर्धकत पूर्ण

Jhimma 2: 'झिम्मा २'ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, सिनेमागृहात अर्धकत पूर्ण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 13, 2024 08:40 AM IST

Hemant Dhome: ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. त्यामुळे प्रदर्शित होणाऱ्या इतर बॉलिवूड सिनेमांना हा चित्रपट टक्कर देत असल्याचे दिसत आहे.

Jhimma 2
Jhimma 2

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे.

आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा २०२३ मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे.
वाचा: हॉरर चित्रपट पाहून भीती वाटत नाही? मग नेटफ्लिक्सवरील 'या' ५ सीरिज नक्की पाहा

‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे.”

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner