Jheel Mehta Viral Video: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील जुनी सोनू आठवतेय का? जुनी म्हणजेच पहिली सोनू भिडे? ही भूमिका अभिनेत्री झील मेहता हिने साकारली होती. या मालिकेतील छोटीशी सोनू आता खूप मोठी झाली आहे. इतकंच काय तर ती आता लवकरच लग्न करणार आहे. पण, याच दरम्यान तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये झील मेहता सिंदूर लावून आपला लूक फ्लाँट करताना दिसली आहे आणि तिने नववधू प्रमाणे लाल साडी नेसलेली आहे. आता झीलचा हा व्हिडिओ पाहून चाहते विचारत आहेत की, तिचे लग्न कधी झाले?
झील मेहताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वधूच्या अवतारात दिसली आहे. मात्र, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने, आपण २०२४ची सर्वोत्कृष्ट वधू बनण्यासाठी सराव करत असल्याचे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये झील मेहता वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो पोज देत आहे. चाहत्यांनाही तिच्या या लूकचे वेड लागले आहे. पण, तिचा हा अवतार पाहून आता तिने लग्न कधी केले, असा प्रश्न सगळ्याच चाहत्यांना पडला आहे.
अभिनेत्री झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हापासून पुढील अनेक वर्ष ती या मालिकेचा भाग होती. मात्र, नंतर तिने या मालिकेतून ब्रेक घेऊन आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा अभिनेत्री निधी भानुशाली हिने घेतली होती. यानंतर झीलने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. आता झील मेहता तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री झील मेहताने ३ जानेवारी २०२४ रोजी तिच्या प्रियकराशी साखरपुडा केला आहे. सध्या त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण, झील मेहताने निश्चितच लग्न या वर्षी होणार असल्याचा इशारा दिला आहे. झील मेहता ही एक प्रसिद्ध बालकलाकार होती. पण, नंतर तिने अभिनय सोडला आणि आता ती मेकअप आर्टिस्ट झाली आहे. यासोबतच ती कौटुंबिक व्यवसाय चालवते. झील मेहता हिने शिक्षणासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता मेकअपशिवाय ती 'सेफ स्टुडंट हाऊसिंग' नावाचे विद्यार्थी वसतिगृह चालवते. झील मेहता यांनी बीबीए केले असून, सध्या ती फायनान्समध्ये पुढील शिक्षण घेत आहे.