'तारक मेहता...'मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तारक मेहता...'मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा

'तारक मेहता...'मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Sep 27, 2024 08:27 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये छोट्या सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान जेठालाल (दिलीप जोशी) सोबत तिचे कसे नाते होते हे सांगितले. याशिवाय शोमध्ये कोणाची फी जास्त होती, हेही तिने सांगितले.

taarak mehta ka ooltah chashmah
taarak mehta ka ooltah chashmah

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहताचा उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वर्षांपासून सुरु आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी शोला निरोप दिला असला तरीही मालिका हिट होताना दिसत आहे. आता या मालिकेतील कोणत्या कलाकाराला सर्वात जास्त मानधन मिळते याविषयी सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताना खुलासा केला आहे.

आतापर्यंत 'तारक मेहताचा उल्टा चष्मा' या मालिकेतील अनेक पात्रांचे चेहरे बदलले असून आजही त्याला पूर्वीइतकेच प्रेम मिळते. झील मेहताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता हिने सांगितले की, शोमध्ये कोणाला जास्त फी मिळत होती. जेठालालशी (दिलीप जोशी) त्याचं कसं नातं होतं हेही तिने सांगितले.

दिलीप जोशीचा लेक शिकतो झीलसोबत शाळेत

झील म्हणाली, दिलीपसोबत तिचे नाते चांगले होते. पण त्यांच्यात एक सीनियर फॅक्टर होता ज्यामुळे ती त्याच्याशी जास्त कनेक्ट होऊ शकली नाही. दिलीपशी कसं बोलावं याबद्दल तिला थोडा संकोच वाटत होता, असं ती म्हणाली. पुढे ती म्हणाली की, दिलीपचा मुलगा तिच्यासोबत शाळेत शिकत आहे आणि ती दिलीपला ओळखते हे शाळेत दाखवायची.

कोणाचे मानधन जास्त?

त्यानंतर दिलीप जोशी, शैलेश लोढा आणि दिशा वकानी यांच्यापैकी कोणाची फी जास्त होती असा प्रश्न झीलला विचारण्यात आला. त्यावर तिने खरं आहे की नाही याची तिला कल्पना नव्हती, पण जेव्हा ती १२०० रुपये कमावत होती आणि दिलीपला तिच्या फिपेक्षा १५ पट जास्त पैसे मिळायचे. दिलीपची फी कुणाच्याही कल्पनेपेक्षा जास्त होती, पण ते ठीक होतं कारण शोमध्ये त्याची कला, त्याचे पात्र फार वेगळे आहे. त्यानंतर झीलने खुलासा केला की, दिलीपनंतर अधिक मानधन घेणाऱ्या इतर कलाकारांमध्ये दिशा वकानी आणि शैलेश लोढा यांचा समावेश होता.
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?

झील विषयी

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत आधी झिल मेहता सोनूची भूमिका साकारत होती. पण सतत शाळा बुडत असल्यामुळे, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे लागत असल्यामुळे तिने या शोला रामराम ठोकला. त्यानंतर निधी भानुशालीने सोनूची भूमिका साकारली होती. मात्र, काही दिवसांनंतर निधीनेही हा शो सोडलाय

Whats_app_banner