‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 03, 2024 05:54 PM IST

ईशा अंबानी- आनंद पिरामल हे सध्याचे सर्वाधिक श्रीमंत घराण्यातील कपल आहे. आता त्यांचे एक घर सेलिब्रिटी कपलने घेतले आहे. त्या घरासाठी त्या सेलिब्रिटी कपलने ५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. चला जाणून घेऊया हे कपल आहे तरी कोण...

‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं घर, ५०० कोटींचा केला करार
‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं घर, ५०० कोटींचा केला करार

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची लाकडकी लेक ईशा अंबानी ही कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिने भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामलशी लग्न केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. सध्या ईशा काही वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ईशा आणि आनंदचे लॉस एंजेलिसमधील आलिशान घर विकले गेले आहे. हे घर एका प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलने घेतल्याचे समोर आले आहे. तसेच हे घर ५०० कोटी रुपयांना विकल्याची माहिती देखील समोर आली आहे.

कोणी खरेदी केले ईशा-आनंतचे घर

ईशा अंबानी आणि आनंत पिरामल यांचे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिसरातील बेव्हरली हिल्य परिसरात आलिशाय घर आहे. त्यांच्या या घराची किंमत ५०० कोटी रुपये आहे. हे घर हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि बेन एॅफ्लेक यांनी विकत घेतले आहे. गेल्यावर्षी त्यांनी ईशासोबत घराचा करार केला होता. या घरासाठी त्यांनी ५०० कोटी रुपये इतकी रक्कम मोजली आहे.
वाचा: गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

ईशाच्या घराची खासियत

लॉस एंजेलिसच्या बेव्हरली हिल्सच्या अगदी मध्यभागी ईशाचा हा बंगला आहे. हा आलिशान बंगला तब्बल ३८ हजार स्क्वेअर फूटमध्ये वसलेला आहे. या बंगल्यामध्ये १२ बेडरुम, २४ बाथरुम, जीम, सलोन रुम, एक इनडोअर पिकलबॉल कोर्ट, स्पा रुम, १५५ फूट लांबीचा इनफिनिटी स्विमिंग पूल, स्वयंपाक घर आणि या बंगल्याबाहेर सुंदर असे हिरवेगार गार्डन आहे.
वाचा: शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

गेल्या वर्षी जून महिन्यात ईशाने अमेरिकन गायिका जेनिफर आणि बेन यांच्याशी करार केला होता. या घरासाठी त्या जोडप्याने जवळपास ६१ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजली आहे.
वाचा: आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट

कोण आहे जेनिफर लोपेझ?

जेनिफर लोपेझ ही अमेरिकन गायिका आहे. तिचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. भारतातही तिच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. जेनिफरने २०२२ मध्ये बेन ऍफ्लेकसोबत चौथे लग्न केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे एकूण ३ हजार ३३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आता जेनिफरने ईशाचे घर खरेदी केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Whats_app_banner